
खवळलेल्या समुद्रात दहा तास चाललेली जगण्याच्या लढाई जिंकली...
ढेबेवाडी (जि. सातारा) : तौक्ते चक्रीवादळामुळे (tautkae cyclone) खवळलेल्या समुद्रात बार्ज बुडाल्याने पाण्यात उडी घेतलेल्या वायचळवाडी (कुंभारगाव, ता. पाटण) येथील अनिल निवृत्ती वायचळ यांनी डोंगरा एवढ्या लाटांशी (waves) धाडसाने दिलेली झुंज अखेर यशस्वी ठरली. लाईफ जॅकेटच्या (life jacket) साह्याने तब्बल नऊ तास समुद्रात तरंगत पडलेल्या वांग खोऱ्याच्या मातीतला या शेरदिल सुपुत्राची नौदलाच्या (navy) पथकाने सुखरूप सुटका केली अन् गेले तीन दिवस डोळ्यात प्राण आणून त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. (tautkae cyclone indian navy saved life satara trending news)
अनिल वायचळ हे मुंबईत अँफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या प्लॅंटवर या कंपनीचे काम सुरू असल्याने सहकाऱ्यांसमवेत ते तिकडे ड्युटीवर होते. त्या सर्वांना चक्रीवादळाबाबत संदेश प्राप्त झाला होता. मात्र, ते ज्यावर थांबलेले होते ते बार्ज मजबूत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे त्यांना वाटत नव्हते. सोमवारी (ता. 17) त्यांनी मोबाईलवरून घरच्यांना मेसेज केला आणि त्यानंतर त्यांचा संपर्कच तुटला.
हेही वाचा: Tauktae नंतर आणखी एक वादळ धडकणार; हवामान विभागाचा अंदाज
वादळामुळे समुद्र खवळल्याने उंचच उंच लाटा उसळू लागल्या अनिल व त्यांचे सहकारी थांबलेल्या बार्जमध्ये पाणी घुसल्याने पाचच्या सुमारास त्यांना लाईफ जॅकेटसह पाण्यात उड्या घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या घेताना काही जण अडकून भरकटले, तर काही एकमेकांचे हात पकडून पाण्यावर तरंगत राहिले. दहा तास त्यांची जणू जगण्या मरण्याची लढाईच लढली. रात्री अडीच वाजता नौदलाचे बचाव पथक पोचल्यावर त्यांना बोटीवर घेऊन नंतर किनाऱ्यावर आणण्यात आले.
बुधवारी ता. 19 सायंकाळी सहा वाजता ते घणसोली मुंबई येथील घरी परतल्यावर त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या कुटुंबीय व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. या वेळी सर्वांचेच डोळे आनंदाश्रूनी डबडबले होते. धाडस तर पूर्वीपासून होतेच; पण आज या जिवावरच्या प्रसंगात नशीब आणि सर्वांच्या आशीर्वादाचे पाठबळ कामी आले, अशी प्रतिक्रिया अनिल वायचळ यांनी ई- सकाळशी बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा: तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना! वर्येत मित्राच्या स्मृतीसाठी साकारलं 'मैत्रीचं झाड'
Web Title: Tautkae Cyclone Indian Navy Saved Life Satara Trending
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..