विंग परिसरात वानरांचा धुडगूस; अन्न-पाण्याच्या शोधार्थ वानरं सैरभैर

विंग परिसरात वानरांचा धुडगूस; अन्न-पाण्याच्या शोधार्थ वानरं सैरभैर

विंग (जि. सातारा) : वानरांचा उपद्रव येथे वाढला असून, कळपाकळपाने ती वावरत आहेत. त्यांची मजल आता घरात घुसेपर्यंत गेली आहे. भर रस्त्यावर अचानक आड येऊ लागल्याने जीवघेणा प्रसंग बेतण्याची शक्‍यता आहे. ग्रामस्थांनी त्यांच्यापासून सावधगिरीने राहण्याची गरज आहे. 

विंगसह परिसरात वानरांचे आठ ते दहा कळप आहेत. एका कळपामध्ये लहान मोठी 30 ते 40 संख्या आहे. अन्न पाण्याच्या शोधात ती सैरभैर झाली आहेत. प्रसंगी ती घरात घुसताना दिसत आहेत. धुडकावण्याचा प्रयत्न केल्यास थेट अंगावर धावून ती येत आहेत. तशा घटना अनेकदा घडलेल्या आहेत. फारसे नादाला त्यामुळे कुणी लागत नाही. वाळत घातलेल्या धान्यावर लक्ष्य त्यांनी केले आहे. एकेका वेळी अख्ख्ये कळपच त्यावर तुटून पडत आहेत. फळभाज्याचे नुकसान ती करताना दिसतात. वारंवार नुकसानीला सामोरे जावे लागत असून, शेतकरीदेखील हैराण झाले आहेत. अक्षरशः निर्भीड ती बनली आहेत. कसलीही भीती त्यांच्यात राहिलेली नाही. असे चित्र आहे. इकडून तिकडे वावरताना रस्त्यावर सहज आड येत आहेत. त्यांना चुकवताना वाहनधारकाची अक्षरशः भांबेरी उडत असून, त्यांचा काळजाचा ठोका चुकत आहे. 

वाहनाच्या अचानक आड अल्याने लहान-मोठे अपघाताचे प्रसंग चर्चेत आहेत. वर्दळीच्या ठिकाणी वावर त्याच्या नित्याचाच बनला आहे. ठिकठिकाणी मंदिरावर घराच्या छप्परावर कळप त्याचे वास्तवास आहेत. धुडगूस घालत आहेत. महिला व लहान मुलांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. स्ट्रीट लाईट खांबावर ते उड्या घेतात. प्रसंगी प्रवाहित दोन वाहिन्यांतील घर्षणामुळे धोकादायक स्थितीला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. दोन कळप एकत्र भिडल्यास त्याच्या विचित्र आवाजाने एकप्रकारे भीती निर्माण होते. त्याच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना मात्र फोल ठरत आहेत. एकादा बेताचा प्रसंग घडण्यापूर्वी वेळीच बंदोबस्त त्याचा करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com