कऱ्हाडला विद्युत शवदाहिनी सुरु करा : पृथ्वीराज चव्हाण

हेमंत पवार
Tuesday, 15 September 2020

पालकमंत्री बाळासाहेब पाटील सह्याद्री कारखान्यावर 150 बेड करत आहेत. वारणाला 50 बेड झाले आहेत. त्यामुळे बेड वाढत आहेत. मात्र, पाटण तालुक्याचा लोड कऱ्हाडवर येत आहे. त्याचबरोबर वाळवा, शिराळा तालुक्यातीलही लोड कऱ्हाडला येतो. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्ण अॅडमीट करण्याची समस्या येत आहे ही खरी गोष्ट असल्याचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

कऱ्हाड  (जि. सातारा) : कऱ्हाड पालिकेवर कोरोना रुग्णांच्या दहनाचा मोठा लोड आहे. त्यासाठी मलकापूरला नवीन स्मशानभूमी सुरु करण्यात आली आहे. यापुढे किती वेगाने कोरोना वाढेल हे सांगता येत नाही. त्यामुळे कऱ्हाड पालिकेने पुढाकार घेवून तातडीने विद्युत शवदाहिनी सुरु करावी. त्यामुळे पावसाळ्यातील त्रास कमी होवून तातडीने दहन होण्याची व्यवस्था होण्यास मदत होईल, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते कऱ्हाड येथे बोलत होते.

कऱ्हाडला बेड उपलब्ध होत नाहीत त्याबाबत आमदार श्री. चव्हाण म्हणाले, कऱ्हाडला बेड वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बहुउद्देशीय हॉलला 50 बेड वाढणार आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री बाळासाहेब पाटील सह्याद्री कारखान्यावर 150 बेड करत आहेत. वारणाला 50 बेड झाले आहेत. त्यामुळे बेड वाढत आहेत. मात्र, पाटण तालुक्याचा लोड कऱ्हाडवर येत आहे. त्याचबरोबर वाळवा, शिराळा तालुक्यातीलही लोड कऱ्हाडला येतो. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्ण अॅडमिट करण्याची समस्या येत आहे ही खरी गोष्ट आहे. 

कांदा निर्यातबंदीबाबत भाजप खासदार उदयनराजे आक्रमक!

सध्या बेड वाढले आहेत. मात्र डॉक्टर, कर्मचारी यांची उपलब्धता नाही. त्यामुळे मोठी समस्या आहे. काही रुग्णालयात राजकीय पॉलिसी वापरली जात आहे. काही पदाधिकारी, आपले कार्यकर्ते यांना प्राधान्य दिले जात आहे, आणि सामान्यांना बेड मिळत नाही, त्यावर काय करता येईल, या प्रश्नावर श्री. चव्हाण म्हणाले, कऱ्हाडला जादा बेडची व्यवस्था करत आहोत. मात्र, कोणत्याही रुग्णालयाने बेड असूनही रुग्णांना बेड नाकारणे हे बरोबर नाही. त्यासाठी प्रशासनाने तातडीने स्वतंत्र अधिकारी नेमून त्यांच्यामार्फत योग्य ती कार्यवाही करावी. त्यामुळे सामान्यांना बेड मिळणे शक्य होईल. त्याची तातडीने विचार प्रशासनाने करावा, असे त्यांनी सांगितले.

जन्म-मृत्यू विभागाचे कामकाज बंद; सातारा पालिकेचे हे विभाग सुरु! 

बेडसाठी हेल्पलाईनला विचारा 
कऱ्हाडला रुग्णांसाठीच्या बेडची माहिती मिळण्यासाठी जिल्हास्तरावर 1077 हा क्रमांक आहे. त्याचबरोबर कऱ्हाडसाठी 02164-222235 हा हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तेथे संपर्क साधल्यास त्यांना बेडची माहिती मिळू शकेल, असे आवाहन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increasing Influence Of Corona In Karad Area Satara News