साता-यात 587 रुग्ण कोरोनामुक्त; जिल्ह्यात आणखी 850 जणांना बाधा

साता-यात 587 रुग्ण कोरोनामुक्त; जिल्ह्यात आणखी 850 जणांना बाधा

सातारा : जिल्ह्यात बुधवारी 850 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बाधितांच्या मृत्यूची संख्या कमी होत नाही, अशी जिल्ह्यातील परिस्थिती झाली आहे. आजही 30 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसात 587 नागरिकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले, तर 984 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. 

जिल्ह्यात बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज रात्री आलेल्या अहवालात 850 जणांना बाधा झाल्याचे समोर आले. या रुग्णांविषयी तपशील समजू शकला नाही. दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 30 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झालेल्यांमध्ये सोनगाव (सातारा), सावंतनगर-खोकळवाडी (सातारा), प्रतापगंज पेठ (सातारा), पाल (ता. कऱ्हाड), किरोली (सातारा), पाडळी (ता. खंडाळा), बोरगाव (सातारा), कासुर्डे (सातारा), म्हसवे (सातारा), नांदगाव (सातारा), बोडकेवाडी (ता. पाटण) येथील प्रत्येकी एक, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये लोणंद (ता. खंडाळा), शिरढोण (ता. कोरेगाव), रहिमतपूर, धर्मपुरी (ता. माळशिरस), गोरखपूर (सातारा), खटाव, कोळकी (फलटण), राऊतवाडी (ता. कोरेगाव), कुमठे (ता. कोरेगाव), रेठरे (ता. कऱ्हाड), उंब्रज (ता. कऱ्हाड), किवळ (ता. कऱ्हाड), तारळे (ता. पाटण), कारंजकरनगर (सातारा), मायणी (ता. खटाव), आनेवाडी (ता. जावळी), हनुमान रोड (महाबळेश्वर), चिंचणी अंबक (ता. कडेगाव) व सांगली येथील प्रत्येकी एक असे एकूण 30 बाधितांचा समावेश आहे. 

काल रात्रीच्या अहवालानुसार 708 नागरिकांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या बाधितांची तालुका व गावनिहाय संख्या अशी : सातारा तालुका : सातारा 18, सदाशिव पेठ 12, वेळे 9, जैन मंदिर आयटी रोड 5, प्रतापगंज पेठ 2, मंगळवार पेठ 3, करंजे 4, धोंडेवाडी 3, शाहूपुरी 4, सदरबझार 2, संभाजीनगर 2, सोनगाव, माहुली, कृष्णानगर, खेड, संगमनगर, यादोगोपाळ पेठ, वारुगड, कारंडवाडी, धावडशी, व्यंकटपुरा पेठ, पानमळेवाडी, गोडोली, करंडी, कामठी, शनिवार पेठ, पोवई नाका, रामाचा गोट, आंबेदरे, जकातवाडी, इंदिरानगर, चिमणपुरा पेठ, रविवार पेठ, निगडी, कारी, कळंबे, पाटखळ, आरफळ, वेणेगाव प्रत्येकी एक. 

कऱ्हाड तालुका : कऱ्हाड 15, वाखाण रोड 2, मंगळवार पेठ 3, गोटे 3, मलकापूर 12, जिंती 6, टेंभू 5, तांबवे 5, शनिवार पेठ 6, मसूर 7, आटके 6, विंग 4, कार्वे नाका 3, आगाशिवनगर 3, कोयना वसाहत 4, काले 4, हजारमाची 2, पाडळी 13, हेळगाव 2, विद्यानगर 5, रेठरे बु. 2, सवादे 2, बुधवार पेठ 2, साळशिरंबे 2, कापिल 2, किरपे, हावळेवाडी, येरावळे, येळगाव, शेनवडी, कोपर्डे, पार्ले, तुळसण, वारुंजी, रेठरे खुर्द, नांदगाव, विहे, तासवडे, केडगाव, जुळेवाडी, आटले, सैदापूर, खराडे, साकुर्डी, मुंढे, उंब्रज, ओंडोशी, साजूर, सोमवार पेठ कऱ्हाड, चोरे, शेणोली, येवती, बाबरमाची प्रत्येकी एक. फलटण तालुका : फलटण 16, कोळकी 3, ठाकुरकी 2, जाधववाडी 3, मठाचीवाडी 2, रविवार पेठ 2, लक्ष्मीनगर 4, स्वामी विवेकानंदनगर 2, गुरसाळे 2, महतपुरा पेठ 3, मलठण 3, रिंगरोड 2, कोरेगाव, माळेवाडी, राजाळे, खाटिक गल्ली, मंगळवार पेठ, धुळदेव, गुणवरे, फरांदवाडी, हाडको कॉलनी, सांगवी, वाठार निंबाळकर, होळ, निंभोरे, पिंप्रद, जलमंदिर, आदर्की, पोलिस कॉलनी, दत्तनगर, तरडगाव प्रत्येकी एक.

भरली ओंजळ आपली; सांडणारी समाजाची : शिंदे बंधूंची गरजूंसाठी धाव 
 
वाई तालुका : वाई 11, मेणवली 2, कोंढवली 3, कणूर 2, एकसर 4, गंगापुरी 10, रविवार पेठ 5, विराटनगर 18, खानापूर 1, भुईंज 5, धर्मपुरी 2, बावधन 6, कवठे 9, किकली 4, गणपती आळी 3, शहाबाग 6, पसरणी 4, सिध्दनाथवाडी 2, जांब 3, यशवंतनगर 4, सह्याद्रीनगर 2, सुरूर 4, आसले 8, पसरणी, सुलतानपूर, किसनवीरनगर, नागेवाडी, वेळे, सोनगिरवाडी, व्याहळी, आकोशी, मिरढे, धोम कॉलनी, रांगोळी आळी, ब्राह्मणशाही, मधली आळी, फुलेनगर, दह्याट प्रत्येकी एक. 

पाटण तालुका : अनवडी 3, गुढे 2, काटेवाडी 4, मोळावलेवाडी 2, पाटण, माजगाव, आंबवणे, दिवशी बुद्रुक, जमदाडवाडी, नाटोशी, सोनवडे, कुंभारगाव, तळमावले, पाचपुतेवाडी, सणबूर, मालदन प्रत्येकी एक. खंडाळा तालुका : लोणंद 5, बावडा 3, शिरवळ 5, खंडाळा, निंबोडे, मधली आळी, संभाजी चौक, शिवाजी चौक, वाघोशी, कोपर्डे, पाडेगाव प्रत्येकी एक. खटाव तालुका : खटाव 4, पुसेसावळी 8, भडकमनगर 5, औंध 2, मायणी 4, वडूज 10, चितळी 5, खरशिंगे 3, तडवळे 2, वाघेश्वर, पेडगाव, जायगाव प्रत्येकी एक. माण तालुका : बिदाल 3, दिवड 2, म्हसवड 16, दहिवडी 5, गोंदावले बु.4, नरवणे 2, शेरेवाडी 2, जांभूळणी 2, पर्यंती 2, वीरकरवाडी, हिंगणी, पानवळ, मार्डी, उकिर्डे प्रत्येकी एक. कोरेगाव तालुका : कोरेगाव 9, किन्हई 2, एकंबे 3, सातारारोड 2, डुबेवाडी 2, भक्तवडी 3, जळगाव 3, सुभाषनगर, पिंपोडे बुद्रुक, खामकरवाडी, तांदुळवाडी, एकंबे, वाठार किरोली, शेंदूरजणे, रेवडी, पळशी, गोळेवाडी, जांब प्रत्येकी एक. जावळी तालुका : मेढा 10, बेलोशी 4, शिंदेवाडी 3, हुमगाव 3, सायगाव 3, सर्जापूर 16, आनेवाडी 3, सोनगाव 3, निझरे 3, रिटकवली 2, भणंग 9, ओझरे, सोमर्डी, कारगाव, सरताळे, मोरघर, महिगाव, आंबेघर, वहागाव, बिभवी प्रत्येकी एक. महाबळेश्वर तालुका : तापोळा एक, पाचगणी 6. इतर 9. बाहेरील जिल्ह्यातील : मुंबई एक, येडेमच्छिंद्र (सांगली) 2 उपचार झाले आहेत.

कोरोना मीटर 

घेतलेले एकूण नमुने : 1,15,606 
एकूण बाधित : 32,222 
घरी सोडण्यात आलेले : 22,212 
मृत्यू : 970 
उपचारार्थ रुग्ण : 9,040 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com