सातारकरांनाे... कुटुंबाचे, समाजाचे रक्षण करण्यासाठी 'हे' करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह

सिद्धार्थ लाटकर
Saturday, 15 August 2020

 या लॅबमुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा अहवाल 24 तासाच्या आत मिळणार असून रुग्णावर वेळेत उपचार करण्यास मोठी मदत होणार आहे असल्याचे जिल्हाधिकारी सिंह यांनी नमूद केले.

सातारा : केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन आपले, आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे रक्षण करावे. कोरोनाचा प्रादुभार्व रोखण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे तसेच सार्वजनिक, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केले.
 
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजवंदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावतीने जनतेसाठी शुभसंदेशाचे वाचन केले. ध्वजवंदनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस गृह रक्षक दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपपोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते.

काेयना धरणाचे दरवाजे का उघडले नाहीत ? सविस्तर वाचा

शिवेंद्रसिंहराजे... पक्षांच्या नेत्यांपुढे गोंडा घोळणे बंद करा 

कोरोनाचे संकट आज सगळ्या जगाबरोबर आपल्या देशावर आहे. या कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर केला. या लॉकडाउनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद झाले यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन मध्ये टप्याटप्याने शिथीलता देवून जीनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. लॉकडाउनमध्ये शिथीलता दिल्यानंतर कोरोना संसर्गाचे रुग्ण आज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. बहुतांश लोक कोणतेही लक्षणे नसलेली किंवा सौम्य लक्षणे असलेली आहेत. पण कोरोनामुळे काही जण दुर्देवाने दगावले आहेत. मृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहेत.

बीएसएनएलचे ग्राहक खासगी मोबाईल कंपन्यांच्या प्रेमात!, का ते वाचा

सातारा जिल्ह्यात काेणती दुकाने शनिवारी, ता.15 बंद राहणार सविस्तर वाचा

कोरोना संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन कसोशिने प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग यांच्यासह विविध विभाग दिवसरात्र काम करीत आहेत. सातारा जिल्ह्यात 22 कोविड हॉस्पीटल असून यामध्ये 981 बेड, 20 कोविड हेल्थ सेंटर असून यामध्ये 851 बेड तर 33 कोरोना केअर सेंटर असून यामध्ये 2 हजार 650 असे एकूण 4 हजार 482 बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील एकही कोरोना बाधित रुग्ण बेड पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

कऱ्हाड : विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास लाखाला फसविले

 आमच ठरलं... या 15 गावांत एक गणपती 

सुरुवातीच्या काळात नमुने हे पुणे येथे तपासणीसाठी पाठविले जात होते तेथून रिपोर्ट यायला उशिर होता. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात लॅबच्या उभारणीचा प्रस्तावाला शासनाकडून मान्यता आणि निधीची पूर्तता झाल्यानंतर अत्याधुनिक लॅब सुरु करण्यात आली आहे. या लॅबममधून रोज 380 जणांचे नमुने तपासले जाणार असून यामध्ये आणखीन वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या लॅबमुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा अहवाल 24 तासाच्या आत मिळणार असून रुग्णावर वेळेत उपचार करण्यास मोठी मदत होणार आहे असल्याचे जिल्हाधिकारी सिंह यांनी नमूद केले.

मैदानावरचा आपला सगळ्यांचा हिरो घरात कसा असतो? तो मुलांशी कसा वागतो? तो पालक म्हणून कसा आहे? वाचा सविस्तर

यावेळी कर्तव्य बजावत असताना पोलिस दलातील पोलिसांचा मृत्यु झाला होता आज त्यांच्या कुटुंबींयाना जिल्हाधिकारी सिंह यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून कुटुंबींयांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कोरोना संसर्ग संकट काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉक्‍टर, अधिकारी, कर्मचारी यांचाही प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी 108 रुग्ण वाहिका सेवा पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ऊर्जा सेवा फाऊडेशनच्यावतीने सहा हजार मास्क जिल्हाधिकाऱ्यांकडे सपुर्त करण्यात आले. यावेळी प्रातांधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

लंडनला जाणारा पहिला मराठी माणूस माहितेयं?  सातारच्या छत्रपतींचा हा सेनापती डायरेक्‍ट लंडनला! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Independence Day Speech Of Satara Guardian Minister Balasaheb Patil