esakal | Inspirationalwomenstories : भारताच्या राष्ट्रीय पक्षाची 'आई' माहितीय?, 'ती' करतेय आयुष्यभर मुक्याप्राण्यांचा सांभाळ
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

सध्याच्या धावपळीच्या जगात प्राणीमात्रांवर प्रेम करणारी माणसं आपल्याला क्वचितच पहायला मिळतील, जी आपल्या पोटच्या पोरांसारखं ती मुक्याप्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात.

Inspirationalwomenstories : भारताच्या राष्ट्रीय पक्षाची 'आई' माहितीय?, 'ती' करतेय आयुष्यभर मुक्याप्राण्यांचा सांभाळ

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : सध्याच्या धावपळीच्या जगात प्राणीमात्रांवर प्रेम करणारी माणसं आपल्याला क्वचितच पहायला मिळतील, जी आपल्या पोटच्या पोरांसारखं ती मुक्याप्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात. माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी नातेसंबंध जोडत असतो. प्राचीन काळापासून माणूस आणि प्राणी दोघांमध्ये एक नाते निर्माण झाले आहे. निसर्ग नियमानुसार माणूस आणि प्राणी यांची शरीरयष्टी वेगळी असली तरी सजीव ही संकल्पना दोघांच्याही बाबतीत खरी ठरते आणि त्याची प्रचित आपल्याला वेळोवेळी अनुभवायला मिळते आणि पहायला सुध्दा! 

वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे जंगले कमी होऊ लागल्याने पशुपक्षाचं जीवन धोक्यात आलंय. अशातच साताऱ्यातील एक सामान्य महिला ललिता केशव या मोरांच्या आई म्हणून ओळखल्या जातात. आजवर त्यांनी अनेक मोरांना जीवनदान दिलं असून त्यांचा पोटच्या पोरासारखा सांभाळ केलाय. ललिता या मागील 12 वर्षांपासून किल्ल्यावरील मोरांची आणि इतर पक्ष्यांची काळजी घेत आहेत. या पक्ष्यांकडे कोण लक्ष देणार असा विचार करुन त्या दररोज त्यांना धान्य आणि पाणी देतात. आपली घरातील कामे झाली की, त्या न चुकता गडावरील मोरांना खाऊ घालण्यासाठी गडावर येतात. आई ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांना खाऊ घालते तितक्याच प्रेमाने ललिता या मोरांना आणि इतर पक्ष्यांना धान्य खाऊ घालतात. ललिता यांच्या या कामात त्यांचे पती आणि सातारकर नेहमी साथ देतात. 

Womens day 2021 : ‘डायन’ ठरविलेल्या तिला पोलिस म्हणतात ‘मॅडम सर’!

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर ललिता केशव यांनी छोट्यासा संसार थाटलाय, तोही आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेल्या पक्षासोबत म्हणजेच, मोरांसमवेत! ललिता यांना या पक्ष्यांकडून कोणतीही अपेक्षा नसून केवळ पक्ष्यांबाबत असलेल्या प्रेमापोटी त्या इतक्या वर्षांपासून हे काम करत आहेत. आज समाजात अशीही काही माणसं आहेत, जी प्राण्यांना आपला जीव की, प्राण समजात. त्यांच्या जगण्यासाठी ते अहोरात्र झटताहेत; अगदी प्रामाणिकपणे कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता.. आई ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांना खाऊ घालते, तितक्याच प्रेमाने ललिता या मोरांना खाऊ भरवत असते. तीच्या या मायेच्या प्रेमापोटी किल्ल्यावरील पक्षही आर्वजून आपली 'आई' कधी आपल्याला खाऊ भरवेल, याचीच जाणू ते वाट पाहत उभे असतात.

Womens day 2021 : अमेरिकेत आजोबांचा वारसा जपणारी नात!

माझं घर अगदी अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी आहे. आयुष्यात एक काळ होता, जेव्हा मी खूप आजारी होते. त्या वेळी माझ्या मुलीने मला सल्ला दिला, की जरा किल्ल्यावर फिरायला जा… तिकडे थोडं मन रमव, तुलाही बरं वाटेल आणि तुझा आजारही पळून जाईल. मीही तिचा तो सल्ला मनावर घेतला आणि किल्ल्यावर जाऊ लागले. निसर्गाच्या सान्निध्यात राहून मला प्रसन्न वाटायला लागलं, आजारपणाचा देखील थोडा विसर पडू लागला. मी किल्ल्यावर फिरत असताना मला तिथे अनेक पक्षी दिसायचे, पण यात मोरांनी मात्र माझं लक्ष वेधलं. मग, तेव्हापासून आजतागायत जवळ-जवळ 17 ते 18 वर्षे त्यांच्यासाठी दररोज धान्य आणि पाणी मी नेहमी नेत असते. त्यानंतर, त्यांच्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून ठेवणं, धान्य ठेवण्यासाठी जागा करणे हे सगळं मी करू लागले.

Womens day 2021 : छोरी छोरों से कम है के! प्रेरणादायक नंदिनी

पण, नंतर माझ्या लक्षात आलं की, फक्त धान्य-पाणी पुरेसं नाही तर या पक्ष्यांसाठी मी फळझाडे लावण्याचाही निर्णय घेतला. आजपर्यंत मी 350-370 पेक्षा जास्त झाडं या किल्ला परिसरात लावली असल्याचे ललिता या आवर्जुन सांगतात. ललिता यांची प्रेरणा घेऊन निसर्गाला आपणही काही देणं लागतो हे लक्षात घेऊन प्रत्येकाने निसर्गाच्या संवर्धनासाठी काही तरी करणं गरजेचं आहे, तेव्हाच आपला परिसर सुजलाम् सुफलाम् होईल. त्याचबरोबर मुक्याप्राण्यांना आपण सर्वतोपरी जीवनदान दिले, तर कित्येक प्राणी-पक्षी वाचतील याचाही विचार होणे गरजेचे आहे. आज जागतिक महिला दिन.. यानिमित्त या मोरांच्या आईचा प्रत्येकाने आदर्श घेतला, तर आपल्या देशातील प्रत्येक स्त्री संबंध जगाची एक दिवस आयडाॅल बनेक, हो ती सर्वांची आदर्श बनेल यात कोणतीच शंका नाही!

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image