esakal | Women's day 2021 : छोरी छोरों से कम है के! प्रेरणादायक नंदिनी

बोलून बातमी शोधा

Nandini_salokhe}

नंदिनी केंद्रात आली, त्यावेळी दोघीच होत्या, आता केंद्रात पन्नास मुली आहेत, हीच बाब नंदिनीची कामगिरी किती प्रेरणादायक आहे हे सांगते.

saptarang
Women's day 2021 : छोरी छोरों से कम है के! प्रेरणादायक नंदिनी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Women's day 2021 : भारतातील महिला कुस्ती म्हणजे हरियाना आणि हरियानातून अन्य संस्थात गेलेल्या महिलांतच विजेतेपदासाठी चुरस असे मानले जाते. त्यामुळेच नंदिनी साळोखेचे राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक जास्त मोलाचे ठरते. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील दहापैकी नऊ सुवर्णपदके हरियानात तयार झालेल्या कुस्तीगिरांनी जिंकली. या निर्विवाद वर्चस्वास महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड येथील तेवीस वर्षीय नंदिनीने हादरा दिला.

महाराष्ट्रातील मातीतून अनेक कुस्तीगीर तयार झाले, पण राष्ट्रीय स्पर्धेत चमकलेल्यात राज्यातील महिला कुस्तीगीर खूपच कमी आहेत. वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत नंदिनीला कुस्तीबाबत फारशी माहितीही नव्हती. तोपर्यंत तिला कबड्डीचे प्रेम होते. कोल्हापूरला २०१० मध्ये क्रीडा प्राधिकरणाने नव्याने कुस्ती केंद्र सुरू केले होते. त्यात खेळाडू असाव्यात यासाठी मार्गदर्शक दादा लवटे यांनी खुली चाचणी जाहीर केली. त्या चाचणीतून लवटे यांनी नंदिनीची निवड केली.

Women's day 2021 : सोशल मीडियावर कसा आहे महिला आमदारांचा वावर? जाणून घ्या​

नंदीनीसमोरील आव्हान सोपे नव्हते. ती तीन वर्षांची असताना तिचे वडील गेले. पण आईने त्याबाबत नंदिनीला काही वर्षांपर्यंत काहीही सांगितले नाही. अनेकांच्या घरी कामे करीत त्यांनी मुलीला वाढवले. तरुण पोरीला कुस्ती कशाला करायला देता, ही विचारणाही त्यांनी कानाआड केली. नंदिनीला यश मिळू लागल्यावर काही पुरस्कर्ते आले. कोरोनाचा जसा प्रत्येक खेळाडूला फटका बसला तसा नंदिनीला बसला. पण तिने हार मानली नाही.
आईचा पाठिंबा तसेच कठोर मेहनतीच्या जोरावर नंदिनी प्रगती करीत आहे. कुस्ती सुरू केल्यावर एका वर्षात तिने राज्य स्पर्धा जिंकली. अठराव्या वर्षी रितू फोगटला अंतिम फेरीत कडवे आव्हान दिले. पण २०१८ च्या राष्ट्रीय कुमारी स्पर्धेच्यावेळी जबर दुखापत झाली. उपचारात एक वर्ष गेले.

Women's Day 2021 : ''फेमिनिझम शिवी नाही, वास्तव आहे!''​

पुनरागमनाच्या राष्ट्रीय स्पर्धेत अंकुशविरुद्ध खेळताना घाबरुन खेळली, कारण तिच्याचविरुद्ध खेळताना दुखापत झाली होती, मात्र यंदा राष्ट्रीय स्पर्धेत त्याच अंकुशला हरवले. या स्पर्धेत चीतपटीने विजय मिळवत तिने सुवर्णपदक जिंकले आणि आता रोम स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. नंदिनी आता ऑलिंपिकला पात्रता मिळवलेल्या विनेश फोगटला पराजित करण्याचे स्वप्न बाळगून आहे, तर नंदिनीच्या कामगिरीपासून प्रेरणा घेऊन अनेक मुली येत आहेत. नंदिनी केंद्रात आली, त्यावेळी दोघीच होत्या, आता केंद्रात पन्नास मुली आहेत, हीच बाब नंदिनीची कामगिरी किती प्रेरणादायक आहे हे सांगते.

- संपादकीय लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)