World Biodiversity Day : साताऱ्याला लाभला 100 देवराईंचा समृद्ध वारसा

World Biodiversity Day
World Biodiversity Dayesakal
Updated on

नागठाणे (सातारा) : जागतिक जैवविविधता दिवस 22 मे रोजी (International Day for Biological Diversity) साजरा होतो. जिल्ह्याला जैवविविधतेचा संपन्न अन्‌ तितकाच समृद्ध वारसा लाभला आहे. जिल्ह्यासाठी ही भूषणावह बाब मानली जाते. मात्र, या जैवविविधतेचे संरक्षण अन्‌ संवर्धन होणेही तितकेच गरजेचे असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करत आहेत. (International Day for Biological Diversity Conservation Of Biodiversity In The Western Part Of Satara District Is Needed)

Summary

सातारा जिल्ह्याचा पश्‍चिम भाग हा वैविध्यपूर्ण जैवविविधतेने नटलेला आहे.

जिल्ह्याचा पश्‍चिम भाग हा वैविध्यपूर्ण जैवविविधतेने नटलेला आहे. विशेषतः महाबळेश्वर, जावळी, पाटण तालुक्‍यांत प्रचंड वनसंपदा, वृक्षसंपदा आहे. त्यातून या क्षेत्रात कित्येक वन्य प्राण्यांचा अधिवास आढळतो. वेगवेगळे कीटक, फुलपाखरे अन्‌ पक्षीही विपुल प्रमाणात आढळतात. त्यातून निसर्गाचे संतुलनही राखण्यास मदत होते. या प्रदेशातील वृक्षसंपदाही पर्यावरणासाठी पूरक ठरते.

अग्निशिखा, वाकेरी, चिचुर्डे, मंजिष्ठ, भारंगी, कुसुंब, हिरडा, शतावरी, नरक्‍या, गोखरू, पुर्ननवा, सर्पगंधा, मालकांगुणी, पित्तपापडा, बकुळ, मुरुडशेंग, मधूनाशिनी यासारख्या दुर्मीळ औषधी वनस्पतीही पश्‍चिम भागात आढळतात. या जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन होणे आवश्‍यक असल्याचे मत या क्षेत्रातील अभ्यासक धनंजय अवसरे यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात सुमारे 100 देवराई आहेत. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले वन वा जंगलाचा छोटासा तुकडा. या देवराई जैवविविधतेसाठी साह्यभूत ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

World Biodiversity Day
खवळलेल्या समुद्राशी विनोदची झुंज अपयशी

देवराईंची संख्या...

जिल्ह्यातील नोंदणीकृत देवराईंची संख्या 86 इतकी आहे. त्यात पाटण तालुक्‍यात 37, जावळी- 17, महाबळेश्वर- 16, सातारा- 13, वाई- तीन देवराई आहेत. नोंदणी न झालेल्या देवराईंची संख्या 14 आहे. देशात सुमारे 15 हजार, तर राज्यात तीन ते साडेतीन हजार देवराई आहेत.

World Biodiversity Day
प्रतापगडावरील तटबंदीची मोहीम 11 महिन्यांत फत्ते

जिल्ह्याला लाभलेला जैवविविधतेचा वारसा अभिमानास्पद आहे. कोयना अभयारण्यापासून कास पठारासारखे जागतिक वारसास्थळ हे जिल्ह्यासाठी भूषणावह ठरणारे आहे. निसर्गाचा हा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असणे अगत्याचे आहे.

-धनंजय अवसरे, अभ्यासक

International Day for Biological Diversity Conservation Of Biodiversity In The Western Part Of Satara District Is Needed

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com