प्रतापगडावरील तटबंदीची मोहीम 11 महिन्यांत फत्ते; 'सह्याद्री'च्या मावळ्यांनी लढवली खिंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pratapgad

प्रतापगडावरील तटबंदीची मोहीम 11 महिन्यांत फत्ते

सातारा : मागील वर्षी पावसाळ्यात ढासळलेल्या प्रतापगडाच्या (Pratapgad) तटबंदीच्या दुरुस्तीचे काम सह्याद्री प्रतिष्ठानच्या (Sahyadri Pratishthan) मावळ्यांनी शिवभक्तांच्या सहकार्याने 11 महिन्यांत पूर्ण केले आहे. (Sahyadri Pratishthan Completed The Repair Work On Pratapgad Satara Marathi News)

सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमंगुंडे यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या वर्षी पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरुवातीला प्रतापगडाची तटबंदीच्या पायाखालील भागाचे भूस्खलन झाल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानला मिळाली. त्यानंतर प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमंगुंडे हे शिवभक्तांसह गडावर पोचले. त्यांनी दुरुस्तीचा पण केला. जून 2020 मध्ये प्रतिष्ठानच्या लोकांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) व राजमाता कल्पनाराजेंची भेट घेऊन त्यांना याबाबतची महिती दिली. आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendraraje Bhosale) यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास व्हाळे व डॉ. तेजस गर्दे यांनी परवानगी दिली. त्यानंतर वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर व सहायक संचालक विलास व्हाळे यांचीही परवानगी मिळाली.

हेही वाचा: Video पहा : Coronafighter आजी काळाच्या पडद्याआड

बांधकामाबाबत चंदनकर इंजिनिअरिंग रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ. भोसले यांच्याशी बैठका झाल्या. त्यानंतर डिझाइन तयार करण्यात आले. 27 जानेवारीला स्थानिकांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. गडावर मशिनरीचे सुटे भाग नेऊन जोडले. त्यानंतर अत्याधुनिक यंत्रणा वापरून काम करण्यात आले. एक मे रोजी महाराष्ट्रदिनी हे काम पूर्ण झाले.

हेही वाचा: शिवसेनेच्या मंत्र्याने भाजपच्या माजी मंत्र्याला दिले आव्हान

दुरुस्तीसाठी जमला 21 लाखांचा निधी

या कामासाठी 22 दिवसांत 21 लाखांचा निधी जमा झाला. त्यासाठी अभिजित पानसे, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला. अनेक संस्था, शिवभक्त सह्याद्री प्रतिष्ठानच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. त्यात फत्तेशिखस्त, फर्जद चित्रपटाचे दिग्दर्शक दीपा लांजेकर, अजय बोरकर, रमेश परदेशी, अजय तापकिरे, प्राजक्ता माळी, माधुरी पवार या सर्वांनी देणग्या दिल्याची माहिती श्रमिक गोजमंगुंडे यांनी दिली. या कार्यात शिवराज्यभिषेक समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, अभयराजे शिरोळे, अमितराजे राजेशिर्के, रणजितसिंह गरुड, इंद्रजितसिंह घोरपडे, गजेंद्र गडकर व इतरांचाही सहभाग होता.

Sahyadri Pratishthan Completed The Repair Work On Pratapgad Satara Marathi News

loading image
go to top