
सातारा: कबड्डी, खो-खो यासारख्या मैदानी व मर्दानी खेळातून आजवर अनेकांनी आपल्या आयुष्याला आकार दिला, व्यक्तिमत्त्व घडविले. त्यामध्ये सातारा शहरातील अनेक मंडळांनी कबड्डीसारख्या खेळातून हजारो खेळाडू घडविण्याचे कार्य केले आहे; पण काळ झपाट्याने बदलत गेला आणि विकासाच्या नावाखाली मोकळी मैदाने कमी झाली. त्यामुळे नव्या पिढीला कबड्डीसारख्या खेळांना मैदान मिळणे कठीण झाले. खेळाडूंची ही अडचण लक्षात घेता आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच सायराबानू शेख यांनी स्वतःची तीन गुंठे जागा कबड्डी खेळाच्या संवर्धनासाठी नुकतीच दिली.