esakal | कऱ्हाडात आंतरराज्य टोळी गजाआड; पोलिसांनी आवळल्या पाचजणांच्या मुसक्या
sakal

बोलून बातमी शोधा

karad crime

कऱ्हाडात आंतरराज्य टोळी गजाआड; पोलिसांनी आवळल्या पाचजणांच्या मुसक्या

sakal_logo
By
- सचिन शिंदे

कऱ्हाड : ऑनलाईन मोबईल मागवून त्याची डिलिव्हरी आणणाऱ्या मुलाला फसवून त्याच पार्सलमधील मोबाईल लंपास करणारी आंतराराज्य चोऱ्या करणारी पाच जणांची टोळी येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेने गजाआड केली. मोबाईलची डिलव्हरी घेवून येणाऱ्या मुलाला मोबाईलचे सुट्टे पैसे देवून ते पैसे तो मुलगा मोजण्यात गर्क असतानाच हातचलाखीने त्या पार्सलमधील मोबाईल लंपास करण्यात येत होता. मोबाईल काढून तेथे तेवढ्या वजनाची साबणाचा बॉक्स टाकला जात होता. हातचलाखीने टोळीने हैराण केले होते. मात्लंर तब्बल एक लाख ७० हजार किमतीच्या मोबाईल संचासह पोलिसांनी त्या टोळीस गजाआड केले आहे. येथे, पुण्यासहीत कल्याण, ठाणे, दादर, नंदुरबार, अलिबाग, रायगड तर इंदूर, भोपाळ, केरळातील कन्नुर व गोवा अशा अन्य राज्यातही चोऱ्यांची कबुली टोळीने दिली आहे.

हेही वाचा: अमित खरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे सल्लागार

पोलिसांनी सांगितले की, रॉबिन ॲन्थाोनी आरोजा (वय २६, मुळ रा. कोचीण, केरळ सध्या बदलापूर), किरण अमृत बनसोडे (२४, रा.कल्याण पूर्व), राहूल मच्छिंद्र राठोड (२१, बदलापूर) रॉकी दिनेश कर्णे (२१, रा. मलंगबाबा रस्ता कल्याण) व गणेश ब्रम्हदेव तिवारी (39, रा. घाटकोपर मुंबई) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. बदलापूर, कल्याण येथे छापा टाकून त्यांना अटक केली आहे. दोन कार, लॅपटॉप, आठ मोबाईल, १४ वेगवेगळी आधारकार्ड, फसवणूकीचे साहित्य असा पाच लाख 26 हजारांचा मुद्देमाल छाप्यात पोलिसांनी जप्त केला आहे. टोळीने बनविलेले बोगस आधारकार्ड, हॉटेलमध्ये वास्तव्याचा पुरावाही पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरिक्षीक अमित बाबर, हवालदार संतोष सपाटे, सतीश जाधव, जयसिंग राजगे, नितीन येळवे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, मारूती लाटणे, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी सहभाग घेतला.

अभिजीत नितीन मोहीते यांनी चार सप्टेंबरला फिर्याद दिली होती. शहरात पाच ठिकाणी ऑनलाईन मोबाईल ऑर्डर स्वीकारताना लंपास होते. त्यात कुरिअर घेवून येणाऱ्याला सुट्टे पैस देवून मोजण्यात व्यस्त ठेवले जात होते. त्याचवेळी पार्सल मधील ऑर्डरचे मोबाईल हातचलाखीने काढून घेतले जात होते. तेथे साबण किंवा बिस्कीटचे बॉक्स ठवले जात होते. हातचलाखीत एक लाख ६९ हजार ९६७ रूपयांची फसवणूक झाली होती. तपासात संशयीतांनी पार्सल मागवण्यास बोगस पत्ता व बोगस सीमकार्डचा वापर केल्याचे निष्पन्न झालेे. त्यामुळे कडवे आव्हान होते. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या तपासात विविध तपास कौशल्यांचा वापर करून डीबीच्या पथकाने पाचजण सहभागी आहेत, ते निष्पन्न केले. त्यानुसार त्यांचे पत्ते काढून त्यांना बदलापूर, टाणे येथे छापे टाकून अटक केली.

हेही वाचा: सलमान दुसऱ्यांदा शाहरुखच्या भेटीला, वडील सलीम खानही सोबत

अशी होती, चोरीची पद्धत

गुगलवरून आधारकार्ड डाऊनलोड करायचे मोबाईलवर घेवून ते इडीटींग करून बोगस आधारकार्ड तयार करायचे. तेच देवून सिमकाडे खरेदी करायचे. त्या सीमकार्डवरून ऑनलाईन स्टोअरवर खाती काढायची. व त्यावरून ऑनलाईन ऑर्डर मागवले जात होते. ऑर्डर केलेला मोबाईल आल्यानंतर संबंधीत डिलीव्हरी घेवून येणाऱ्यास सुट्टे पैसे मोजण्यास दयायचे. तो पैसे मोजत असताना हातचलाखीने मुळ पार्सलमधील मोबाईल काढून घेवून तेथे साबणाचा बॉक्स टाकायचा. मोबाईल पार्सलचे वजन व त्या बदल्यात टाकलेल्या साबणाचा बॉक्सचे वजन तंतोतत जुळवले जात होते. टोळीतील संशयीत उच्चशिक्षित आहेत. त्यांनी तांत्रिक ज्ञानाच्या वापर करून फसवणूकीचे प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद टोळीचे पुढील टार्गेट पुणे जिल्ह्यातील उरळीकांचन पुणे होते. मात्र तत्पूर्वीच कऱ्हाड पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

loading image
go to top