esakal | ढेबेवाडीत बनावट नोटांचं कनेक्शन; आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश!
sakal

बोलून बातमी शोधा

Fake Money

वेगवेगळ्या घटना आणि गुन्हे यामुळे सतत चर्चेत राहणारे ढेबेवाडी खोरे आता बनावट नोटा प्रकरणामुळे चर्चेत आले आहे.

ढेबेवाडीत बनावट नोटांचं कनेक्शन; आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश!

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : निगडी पोलिसांनी (Nigdi police) पर्दाफाश केलेल्या बनावट नोटांच्या (Fake Money) आंतरराज्यीय रॅकेटचे (Interstate racket) धागेदोरे ढेबेवाडीपर्यंत पोचल्याने विभागात मोठीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयिताने ढेबेवाडी परिसरात बनावट नोटा खपविल्या तर नाहीत ना? खपविल्या असल्यास त्या कुठे-कुठे फिरत आहेत? हे शोधण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर असणार आहे. वेगवेगळ्या घटना आणि गुन्हे यामुळे सतत चर्चेत राहणारे ढेबेवाडी खोरे (Dhebewadi Valley) आता बनावट नोटा प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. (Interstate Racket Connection Of Fake Money In Dhebewadi Valley Crime News bam92)

निगडी पोलिसांनी बनावट नोटा तयार करणारे आंतरराज्य रॅकेट उघडकीस आणून याप्रकरणी सहा जणांना अटक केल्यानंतर गुन्ह्याचा एक धागा ढेबेवाडीपर्यंत पोचल्याने याप्रकरणी चर्चांना उधाण आले आहे. निगडी पोलिसांनी ताब्यात घेतलेला येथील संशयित तात्पुरता ढेबेवाडीत राहण्यास असला तरी तो मूळचा येथील नाही. गुन्ह्यात त्याचे नाव समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांना थांगपत्ता लागू न देता अत्यंत गुप्तपणे निगडी पोलिस त्यांच्यापर्यंत पोचल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित संशयिताचा ढेबेवाडीतील मुक्काम, येणे- जाणे व संपर्क याबाबी लक्षात घेता या परिसरात त्याने बनावट नोटा खपविल्या तर नाहीत ना? खपविल्या असल्यास त्या कुठे- कुठे फिरत आहेत, हे शोधण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

हेही वाचा: तीन आमदार, एक खासदार असूनही 'राष्ट्रवादी'ला मिळेना 'जिल्हाध्यक्ष'

याबाबत ढेबेवाडी पोलिसांशी (Dhebewadi Police) संपर्क साधला असता, बनावट नोटांमुळे फसवणूक झाल्याबाबत आमच्याकडे तक्रारी आलेल्या नाहीत, मात्र येथे राहणाऱ्या एका संशयिताचे नाव निगडी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आल्याने माहिती घेत आहोत. आम्ही निगडी पोलिसांकडून अगोदर या गुन्ह्याची माहिती घेऊ आणि येथे राहणाऱ्या संशयिताने बनावट नोटा या परिसरात कुठे खपविलेल्या तर नाहीत ना? याचाही शोध घेऊ, असे सांगण्यात आले. ढेबेवाडी खोऱ्याचे नाव यापूर्वीही काही वर्षांपूर्वी बनावट नोटा प्रकरणात चर्चेस आले होते. आता निगडित सापडलेल्या नव्या रॅकेटमुळे पुन्हा ढेबेवाडी चर्चेचा विषय बनली आहे.

Interstate Racket Connection Of Fake Money In Dhebewadi Valley Crime News bam92

loading image