
सातारा शहराच्या हद्दवाढीस मंजुरी मिळाल्याने शाहूपुरी ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली. बरखास्तीनंतर त्या ठिकाणचे प्रशासकीय कामकाज नियमित चालावे, यासाठी पालिकेने त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त केला आहे.
सातारा : हद्दवाढीमुळे सातारा नगरपालिकेत समावेश झालेल्या शाहूपुरीमधील विकासकामांबाबत माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांना निवेदन दिले. या निवेदनात शाहूपुरीतील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या दैनंदिन सुविधा पुरविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
हे ही वाचा : खंबाटकी घाटातील दरीत खजूराचा कंटनेर कोसळला
सातारा शहराच्या हद्दवाढीस मंजुरी मिळाल्याने शाहूपुरी ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली. बरखास्तीनंतर त्या ठिकाणचे प्रशासकीय कामकाज नियमित चालावे, यासाठी पालिकेने त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त केला आहे. या प्रशासकाच्या आदेशानुसार सध्या शाहूपुरी हद्दीत अत्यावश्यक सोयी-सुविधा नागरिकांना पुरविण्यात येत आहेत. या सोयी-सुविधा पुरविण्याच्या क्षमतेत वाढ करण्याची मागणी करत त्यासाठीचे निवेदन संजय पाटील यांनी नगराध्यक्षा कदम यांना दिले. या वेळी माजी सरपंच गणेश आरडे, अमित कुलकर्णी व इतर नागरिक उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
श्री. पाटील यांनी शाहूपुरीच्या सहा प्रभागांत एकाआड एक दिवस कचरा संकलन करण्यात येत आहे. कचरा संकलनात सातत्य राहण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र घंटागाडी नेमण्याची तसेच त्रिशंकू भागासाठी दोन आणि रस्त्यावरील कचरा संकलनासाठी एक अशा नऊ गाड्यांची मागणी केली. ज्या ठिकाणच्या सार्वजनिक खांबावर दिवे नाहीत, त्याठिकाणी एलईडी बसविण्याची, कामासाठीच्या निघालेल्या वर्कऑर्डरनुसार संबंधित कामे तत्काळ सुरू करण्याची, ग्रामपंचायत फंडातील मंजूर कामांचे ई- टेंडरिंग करण्याची मागणीही पाटील यांनी यावेळी केली.
ताज्या बातम्या वाचण्यासाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा
मागणी करतानाच शाहूपुरीवासीयांसाठी 12 विकासकामे आवश्यक असून, त्यांना मंजुरी देण्याची विनंती नगराध्यक्षा कदम यांच्याकडे केली. पाटील व नागरिकांनी केलेल्या मागण्यांबाबत पालिका प्रशासनाकडून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन नगराध्यक्षा कदम यांनी यावेळी दिले.