Jaggery : गुळाला 6800 उच्चांकी दर; कऱ्हाड बाजार समितीत सौदे, सरासरी मिळाला 4100 रुपयांचा दर

कऱ्हाड (जि.सातारा) येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गुळाला उच्चांकी सहा हजार आठशे रुपयांचा दर मिळाला.
Jaggery Auction
Jaggery Auctionsakal

कऱ्हाड - कऱ्हाड (जि.सातारा) येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गुळाला उच्चांकी सहा हजार आठशे रुपयांचा दर मिळाला. कोतोली (ता. शाहूवाडी, जि.कोल्हापूर) येथील शेतकरी अरुणकुमार दौलू पाटील यांच्या गुळाला सहा हजार आठशे रुपये तर पार्ले (ता. कऱ्हाड) येथील शेतकरी निखील मारुती नलवडे यांच्या गुळाला सहा हजार चारशे रुपये उच्चांकी दर मिळाला.

येथील बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे. गुळाला चार हजार १०० रुपये सरासरी दर मिळत आहे. आज झालेल्या सौद्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी गुळ दर शेतकऱ्यांना मिळाला. आज बाजार समितीतील शिवतेज ट्रेडींग कंपनी या आडत दुकानात सौदे झाले. त्यात रेदीदार व्यापारी मे. ए. एफ. ट्रेडर्स व मे. डी. के. ब्रदर्स यांनी तो गुळ खरेदी केला.

आजच्या सौद्यांमध्ये एकूण ४४८ क्विंटल गुळाची बिक्री होवून गुळाला सरासरी चार हजार १०० रुपये दर मिळाला. अरुणकुमार पाटील आणि निखील नलवडे या शेतक-यांचा सत्कार बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांचे हस्ते व संचालक जयंतीलाल पटेल, उत्तमराव जाधव, प्रभारी सचिव आबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी बाजार समितीचे अधिकारी, कर्मचाी उपस्थित होते. शेतकरी बांधवानी आपला रसाळ, कणीदार, चिक्की स्वरुपाचा, भेसळरहीत गुळ मार्केट यार्डमध्ये विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती कदम यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com