कोविड केअर सेंटरसाठी आता मुस्लिम समाजही सरसावला

सचिन शिंदे
Tuesday, 8 September 2020

या काेराेना केअर सेंटरमध्ये सकाळी सात वाजता नाश्ता, दुपारी एक वाजता जेवण, सायंकाळी पाच वाजता चहा, बिस्कीट तर रात्री आठ वाजता जेवण दिले जाणार आहे.

कऱ्हाड : कोरोनाचा कहर वाढतो आहे. ही गोष्ट लक्षात घेवून कऱ्हाडमध्ये जैन समाजापाठोपाठ मुस्लीम समाजाने पुढाकार घेवून सर्वांसाठी अद्ययावत वारणा कोविड केअर सेंटर उभा केले आहे. मलकापूर येथील वारणा हॉटेलची इमारत त्यासाठी घेतली आहे.
साताऱ्याची हद्दवाढ झाली

तेथे केअर सेंटरची काम अंतीम टप्प्यात आहे, दोनच दिवसात सेंटर कार्यरत होईल. तब्बल 50 हून अधिक बेडची तेथे सोय आहे. त्यात ऑक्सीजनचे 28 तर 24 साध्या बेडची व्यवस्था आहे. माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी तीन लाखांचा निधी दिला आहे.

विधान परिषदेचे उपसभापतिपद बिनविरोध करा : रामराजे नाईक निंबाळकर 

जैन समाजाबरोबरच मुस्लीम समाजही वारण कोविड सेंटर सर्वांसाठी उभारत आहे. त्यामुळे कोरोनाच्या रूग्णांची चांगली सोय होणार आहे. त्याला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकतीच भेट देवून पहाणी केली आहे. त्यानंतर या काेराेना सेंटरला मंजूरी दिली आहे. येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातंर्गत वारणा कोविड सेटंर स्वंतत्रपणे कार्यरत राहणार आहे. तेथे 50 अद्ययावत बेडची व्यवस्था केली आहे. प्रत्येक बेडला ऑक्सीजन पाईंट आहे. प्रत्येक बेड फोल्डींग आहे. कोळेकर हॉस्पीटलने कोविड सेंटरला 12 बेड दिले आहेत. त्याशिवाय चाळीस बेड खरेदी केले आहेत. त्या केअर सेंटरमध्ये दहा डॉक्टर व 12 नर्सींग स्टाफही सेवेत असणार आहे. केअर सेंटरला माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी तीन लाखांचा निधी दिला आहे.

सातारा जिल्ह्यात नाेकरीची माेठी संधी; नर्स, वॉर्डबॉय, वैद्यकीय अधिकारी हवेत 

कोविड सेंटर उभा करण्यासाठी मुस्लीम समाजातील माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, ज्येष्ठ नगरसेवक फारूक पटवेकर, नगरसेवक मोहसीन आंबेकरी, अख्तर आंबेकरी, माजी नगरसेवक हाजी महजर कागदी, इसाक सवार, रफीक सय्यद, इरफान सय्यद, बशीर कारभारी, मुसद्दीक आंबेकरी यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले आहेत. 

सातारा : स्वत:हून होम आयसोलेशनचा निर्णय आला अंगलट

या काेराेना केअर सेंटरमध्ये सकाळी सात वाजता नाश्ता, दुपारी एक वाजता जेवण, सायंकाळी पाच वाजता चहा, बिस्कीट तर रात्री आठ वाजता जेवण दिले जाणार आहे. त्यामध्ये प्रतिकार शक्ती वाढवणारे घटक असतील. त्यामुळे रूग्णांची चांगली सोय येथे होणार असून येत्या दोन दिवसात कोरोना सेंटर कार्यरत होणार आहे.

कऱ्हाडला कोरोना सर्व्हे यंत्रणेत समन्वयाचा अभाव

संपादन : सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jain Muslim Community Setup Covid Centers In Karad