कऱ्हाडात जनशक्ती, लोकशाही आघाडी आक्रमक

Karad Municipality
Karad Municipalityesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : वर्षभरापासून पालिकेची (Karad Municipality) मासिक सर्वसाधारण, तर सहा महिन्यांपासून स्थायी समितीची बैठक झालेली नाही. त्या दोन्ही न झाल्याने विकासकामांचे तब्बल २०० हून अधिक विषय मंजुरीअभावी रखडले आहेत. त्याचा विकासावर परिणाम होतो आहे. त्यामुळे ती कामे मार्गी लागावीत, यासाठी लोकशाही व जनशक्ती आघाडीने मासिक बैठक घ्याव्यात, अशी मागणी वेगवेगळ्या पत्रांद्वारे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde), मुख्याधिकारी रमाकांत डाके (Ramakant Dake) यांच्याकडे केल्या आहेत. पालिका प्रशासनाने त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामळे दोन्ही आघाड्यांकडून जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्याकडे बैठकीची मागणी केली आहे.

Summary

वर्षभरापासून पालिकेची मासिक सर्वसाधारण, तर सहा महिन्यांपासून स्थायी समितीची बैठक झालेली नाही.

पालिकेत मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ सुरू आहे. पालिकेची मुदत संपेपर्यंत अद्यापही दोन मासिक सभा होतील, अशी अपेक्षी आहे. काही नगरसेवकांना सभा होऊ द्यायची नाही तर लोकशाही, जनशक्ती आघाडीला सभा हवी आहे, अशी स्थिती आहे. सभा न झाल्याने अनेक विकासकामे रखडली आहेत. सभा झाल्यास ती मार्गी लागतील, अशी भूमिका घेऊन दोन्ही आघाड्या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वेगवेगळी पत्रे लिहून मासिक व स्थायी समिती घेण्याची मागणी नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. मासिक बैठक न झाल्याने विकासकामांवर परिणाम होतो आहे, अशी भूमिका घेत जनशक्तीने नगराध्यक्षा शिंदे, मुख्याधिकारी डाके यांच्याकडे मासिक सभेची मागणी केली आहे.

Karad Municipality
निवडणुकीवर 'पैसा' खर्च करण्यापेक्षा निवडणुका 'बिनविरोध' करा

मासिक सभेची मागणी मान्य न झाल्यास थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे जनशक्तीकडून सभा घेण्याची मागणी केली जाणार आहे. पालिकेत तब्बल वर्षापूर्वी मासिक सर्वसधारण सभा, तर किमान सहा महिन्यांपूर्वी स्थायी समितीची सभा झाली आहे. दोन्ही सभा व्हाव्यात, यासाठी लोकशाही आघाडी आक्रमक झाली आहे. गटनेते सौरभ पाटील यांनी त्याचे लेखी पत्र नगराध्यक्षा शिंदे, मुख्याधिकारी डाके यांना दिले आहे. सभाच न झाल्याने विकासावर होणार परिणाम घातक आहे. त्यासाठी दोन्ही सभा घ्याव्यात, अशी मागणी गटनेते श्री. पाटील यांनी केली आहे. ती मागणी मान्य न झाल्यास थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे सभा घेण्याची मागणी केली जाणार आहे.

Karad Municipality
मेढ्यातील देशमुख कुटुंबावरील बहिष्कार मागे

कऱ्हाड शहरातील तब्बल २०० हून अधिक विकासकामे रखडली आहेत. त्यांच्या मंजुरीसह त्यावर चर्चेसाठी सभेची गरज आहे. त्यामुळे सभा घ्यावी, अशी मागणी आहे. मागणी मान्य न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे सभा घेण्याची मागणी करणार आहोत.

-सौरभ पाटील, गटनेते, लोकशाही आघाडी

Karad Municipality
साताऱ्यातील बालसुधारगृहात अल्पवयीन संशयिताची आत्महत्या

विविध विकासकामांना मंजुरी अपेक्षित आहे. त्या विषयांना मंजुरीसाठी सभा गरजेची आहे. स्मशानभूमीची कामे, घनकचरा प्रकल्पातील कामांची मंजुरी, पावसामुळे साचणाऱ्या पाण्यावर उपाययोजना करणे आदींसह अन्य कामे रखडली आहेत. सभा न घेण्याचे होणारे राजकारण मारक आहे.

-विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती, कऱ्हाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com