Janugadewadi Bus Accident: जानुगडेवाडीत बसचा अपघात; 30 प्रवासी जखमी, खासगी बसला वाचविताना घडली घटना, बस धडकली झाडाला
ST Bus hits tree in Janugadewadi: पाटण आगाराची सळवे - ढेबेवाडी -पाटण बस (एम एच १४ बीटी ११२७) सकाळी सळवेहून ढेबेवाडीकडे निघाली असताना जानुगडेवाडीजवळच्या धोकादायक वळणावर अचानक खासगी बस समोर आल्याने एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस झाडावर जावून धडकली.
ढेबेवाडी : धोकादायक वळणावर खासगी बसला वाचविताना एसटी बस झाडाला धडकून झालेल्या अपघातात एस टी बसमधील ३० प्रवासी जखमी झाले. ढेबेवाडी - सळवे मार्गावर जानुगडेवाडी(ता.पाटण) नजीक आज सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला.