Jat Drought Protest : कोरड्या दोड्डनाला तलावात गणरायाची आरती दुष्काळ जाहीर करण्याची मागणी : तम्मनगौडा रविपाटील यांचे अनोखे आंदोलन

Ganpati Aarti Held at Dry Doddanala Lake ; जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी माजी सभापती तम्मनगौडा रविपाटील यांनी कोरड्या दोड्डनाला तलावात गणरायाची आरती केली.
Jat Drought Protest

Jat Drought Protest

esakal

Updated on

जत : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पूर्व भागातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासह शेती व पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक तलाव कोरडे पडले असतानाच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माजी सभापती तम्मनगौडा रविपाटील यांनी उमदीसह सीमाभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या कोरड्या दोड्डनाला तलावात गणरायाची आरती करून लक्ष वेधले.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये टंचाईची स्थिती आहे. तलाव, बंधारे व पाणवठे कोरडे पडल्याने नागरिक, पशुपालक शेतकऱ्यांसमोर पाणी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हैसाळ सिंचन योजना असूनही योग्य नियोजनाअभावी तिच्या पाण्याचा शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याची तक्रार आहे. गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे कोरड्या तलावातच गणरायाची आरती करून ‘जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा,’ अशी मागणी करण्यात आली.

Jat Drought Protest
Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

रविपाटील म्हणाले, ‘‘जत तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. विशेषतः पूर्वभागातील नागरिकांना पिण्याचे, शेतकऱ्यांना शेतीचे पाणी आणि पशुपालकांना जनावरांसाठी पाण्याची अडचण भेडसावत आहे. अनेक तलाव कोरडे पडलेत. म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे योग्य नियोजन करून कोरडे तलाव भरावेत.’’

‘‘शासनाने जत तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून दुष्काळी भागासाठीच्या उपाययोजना लागू कराव्यात. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच म्हैसाळ योजनेतून तलाव भरण्याची कार्यवाही करावी,’’ अशी मागणी त्यांनी केली.

Jat Drought Protest
Gangs Of Wasseypur: वासेपूर पुन्हा गोळीबाराने हादरले; फहीम खानच्या भावावर दिवसाढवळ्या हल्ला, गँगवॉर पुन्हा भडकणार?

कोरड्या तलावात झालेली गणरायाची आरती ही जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधणारी ठरली. सरकारने परिस्थितीची पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे. पूर्व भागातील शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli District Bank Election
Sangli Political News
75-year-old police patil dies in wildlife attack in Jat
Jat road blockade case against former MLAs 2026
Marathi News Esakal
www.esakal.com