जावली पंचायत समितीच्या माजी सभापतींचे सदस्यत्व अखेर रद्द | Javli Panchayat Samiti Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Javli Panchayat Samiti Election

जावली पंचायत समितीच्या माजी सभापतींचे सदस्यत्व अखेर रद्द

कुडाळ - ग्रामपंचायतीचा कर भरणा न करता सन २०१७ मध्ये जावली पंचायत समिती च्या म्हसवे गणातून निवडणूक लढवून सभापती पदी भूषविणार्या अरुणा शिर्के यांचे सदस्यत्व अपात्र असल्याचा निर्णय अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांनी नुकताच दिला. यानिर्णयाने जावली तालुक्या सह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. (Javli Panchayat Samiti Election Updates)

याबाबतची अधिक माहिती अशी,जावली पंचायत समितीच्या सन २०१७ साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अरुणा अजय शिर्के या म्हसवे गणातून निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. परंतू या त्यांनी ते राहत असलेल्या एकञ कुटुंबातील घराचा ग्रामपंचायतीचा कर भरण्यात आला नव्हता.

त्यामुळे ते शासनाचे थकबाकीदार असल्याने त्यांचे कडून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील तरतुदीचा भंग झाला आहे.त्यामुळे अरुणा शिर्के त्यांचे पंचायत समितीचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी याच गावातील रहिवासी व जावली तालुका दुध पुरवठा संघाचे माजी उपाध्यक्ष कृष्णा जगदेव शिर्के यांनी जिल्हाधिकारी सातारा यांचे कडे केली होती.त्यानुसार सन २०१९ मध्ये या दोघांचे व अन्य चार जणांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी सातारा यांनी अपात्र ठरविले होते.

हेही वाचा: बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

परंतू याबाबत निर्णय देणे जिल्हाधिकारी यांच्या अधिकार कक्षेत येत नसल्याने या निर्णयाला विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली होती. या निर्णयावर कृष्णा शिर्के यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांच्या कडे नव्याने अपील दाखल केले होते.याबाबत मे.न्यायालयाने ता.२६/११/२१ रोजी निर्णय देऊन अरुणा अजय शिर्के यांचे पंचायत समितीचे सदस्यत्व रद्द ठरविले. मे.न्यायालयात कृष्णा शिर्के यांच्या तर्फे मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अड.गणेश जाधव यांनी बाजू मांडली.

उशीरा न्याय मिळाल्याने नाराजी - कृष्णा शिर्के

वास्तविक अशी राजकीय पदे पाच वर्षांच्या मर्यादित कालावधीसाठी असल्याने असे निर्णय तातडीने होणे आवश्यक आहे.या निर्णयाबाबत कोरोना संसर्गामुळे निर्णय देण्यात विलंब होत असल्याचे नमूद केले आहे.परंतू दरम्यानच्या काळात संबंधित अपात्र असलेल्या सदस्याचा कालावधी संपत आला आहे. न्याय मिळाल्याचे समाधान वाटत असले तरीही न्याय मिळण्यासाठी विलंब लागल्याने कृष्णा शिर्के यांच्या पंचायत समिती गणातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top