दुधेबावी: सरकारी नोकरी लावतो, म्हणून जावली (ता. फलटण) येथील एका युवकाची दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्यात ‘माण-विद्यापीठ चौक’ मेट्रो चाचणी यशस्वी; एकोणीस किलोमीटरचे काम पूर्ण, मार्चअखेरपर्यंत मार्ग होणार खुला...पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जावली येथील अभिषेक हणमंत गावडे (व्यावसायिक खासगी नोकरी, रा. जावली, ता. फलटण) हे कामानिमित्त पुणे जिल्हा परिषदेत गेले असता रामकिशन गंगाधर घ्यार (रा. डी सरकारी निवास क्र. एक, आरोग्य केंद्र रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याशी ओळख झाली. त्यांनतर त्यांनी गावडेंचा मोबाईल नंबर घेतला..काही दिवसांनंतर रामकिशन घ्यार यांनी गावडेंना व्हॉट्सॲप कॉल करून डीएमईआरमध्ये फार्मासिस्ट म्हणून सरकारी नोकरी लावतो, असे सांगितले. त्यानंतर रामकिशन घ्यार हे गावडे यांच्या मूळ गावी जावली येथे आले. तुम्हाला डीएमईआर फार्मासिस्ट म्हणून सरकारी नोकरी लावण्यासाठी दहा लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणाले. त्यानंतर त्यांनी डॉ. भगवान अंतू पवार यांना कॉल केला. डॉ. पवार यांनी गावडेंना डीएमईआरमध्ये फार्मासिस्ट म्हणून सरकारी नोकरी लावतो, असे आश्वासन दिले..नोकरी लावण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. रामकिशन घ्यार व डॉ. भगवान पवार यांच्यामध्ये झालेले संभाषण गावडेंना दाखवले. ता. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी गावडेंनी आईचे सोन्याचे दागिने बँक ऑफ इंडिया येथे ठेवून सहा लाख ५३ हजार रुपये काढले. त्यामध्ये गावडेंनी स्वतःजवळील काही रक्कम घालून सात लाख रुपये रामकिशन घ्यार यांच्या कॅनरा बँक अकाउंट नंबरवर पाठवले. त्यानंतर राहिलेली रक्कम तीन लाख रुपये गावडेंनी आईचे सोने बँक ऑफ महाराष्ट्र येथे तारण लोन करून ती रक्कम इंडसइंड या बँकेतून रामकिशन घ्यार यांच्या कॅनरा बँक अकाउंट नंबरवर २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पाठवले. .MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!.त्यानंतर डीएमईआर फार्मासिस्ट या परीक्षेचा निकाल लागला; परंतु त्यामध्ये गावडेंचे नाव आले नाही, म्हणून त्यांनी रामकिशन घ्यार यांना फोन केला असता त्यांनी पुढच्या आठवड्यामध्ये दुसरी यादी लागणार आहे. त्यामध्ये तुमचे नाव येईल, असे सांगितले; परंतु त्यानंतर लिस्ट लागली नाही. गावडेंनी फसवणूक झाल्यानंतर रामकिशन गंगाधर घ्यार व डॉ. भगवान अंतू पवार (पत्ता माहिती नाही) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक पवार करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.