

Man Satara Woman Gets New Home After Losing House In Heavy Rain Jaykumar Gore Hands Over Keys In Emotional Event
sakal
-रूपेश कदम
दहिवडी: शब्द फक्त द्यायचा नसतो, तर तो पाळायचा असतो. याचाच प्रत्यय ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्यक्षात दिला. अस्मानी संकटात घर उद्ध्वस्त झालेल्या एका निराधार महिलेला एका वर्षात हक्काचा निवारा मिळवून दिला अन् आज अतिशय भावनिक वातावरणात मंत्री गोरे यांनी त्या महिलेचा गृहप्रवेश घडविला.