Karad Crime
सातारा
Karad Crime: सैदापूर, कोयना वसाहतीमधून साडेसहा लाखांचे दागिने लंपास; पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंद
Saidapur, Koyna Heist: सायंकाळी चारला त्या घरी परतल्या. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. बेडरूममधील कपाटातील वस्तू विस्कटल्या होत्या. कपाटात ठेवलेले एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व १० हजार रुपये रोख असा एकूण ६५ हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
कऱ्हाड : सैदापूर व कोयना वसाहत परिसरात दुपारच्या सुमारास दोन वेगवेगळ्या घरफोड्यांच्या घटना घडल्या. त्यात चोरट्यांनी सहा लाख ५० हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. सैदापूर येथील मयुरेश अपार्टमेंटमध्ये दुपारी चोरी झाली. नीलम खांबे या पती व मुलांसह घर बंद करून पाहुण्यांकडे गेल्या होत्या.

