
सातारा : ग्रामीण भागातील नागरिकांना दरडोई ५५ लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने जलजीवन मिशन योजना कार्यान्वित केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात ११०० कामे मंजूर असून, ही कामे येत्या मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.