
“Reservation reshuffle changes Malkapur’s political scene; big names face unexpected setback.
Sakal
मलकापूर : येथील पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज ११ प्रभागांतील २२ जागांसाठी आरक्षण जाहीर झाले. आरक्षणात महिलांचे ११ जागांवर आरक्षण पडले आहे. आरक्षण जाहीर होताच राजकीय कार्यकर्त्यांसाठी कही खुशी कही गम असे चित्र दिसले. काही दिग्गजांना आरक्षणाचा फटका बसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी दिसत होती. मात्र, त्याच क्षणी इतर प्रभागांचा विचार ते मांडताना दिसत होते. आरक्षण काय पडते हे पाहण्यासाठी सर्वच राजकीय गटातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.