

Satara Crime:
Sakal
औंध : कळंबी (ता. खटाव) येथील वृद्ध महिलेच्या गळ्यातील बोरमाळ हिसकावून पोबारा करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला औंध पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. सुधीर ऊर्फ सुधाकर अशोक मोहिते (रा. कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणातील एक संशयित फरारी आहे.