
कराडमध्ये कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. दोन दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा झाला होता आणि लवकरच लग्न होणार होता. दरम्यान, २६ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळभळ उडालीय. कल्पना बाळाप्पा वाघमारे असं तरुणीचं नाव आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. यानंतर पुलावर मोठी गर्दी झाली होती.