
कऱ्हाड: शहरानजीकच्या एका महाविद्यालयात शिक्षण घेणारी युवती तिच्या मैत्रिणींसोबत चालत वसतिगृहाकडे निघालेली असताना मोटारीतून आलेल्यांनी तिचे अपहरण केले. याप्रकरणी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित युवतीच्या शोधासह संशयितांना पकडण्यासाठी पोलिस पथके पुणे, मुंबईसह ठिकठिकाणी रवाना झाली आहेत.