Karad Crime : कऱ्हाडच्या तीन सराईत गुंडावर मोक्कातंर्गत कारवाई; विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून प्रस्ताव मंजूर

कऱ्हाड शहर, परिसरात पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हे करणाऱ्या कुख्यात गुंडाच्या तिघांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Mokka crime
Mokka crimeSakal

- सचिन शिंदे

कऱ्हाड - शहर, परिसरात पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हे करणाऱ्या कुख्यात गुंडाच्या तिघांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तब्बल दहा वर्षाने कारवाई झालेले तिघेही हजारमाची येथील आहेत. सोमा ऊर्फ सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी (वय ३३ वर्षे) हा टोळी प्रमुख आहे. रविराज शिवाजी पळसे (२७) व आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी (१९ वर्षे) अशी अन्य दोन सदस्यांची नावे आहेत.

टोळीवर मोक्कांतर्गत कारवाईसाठी पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या केलेल्या शिफारशीला विशेष पोलिस महानिरिक्षक सुनील फुलारी यांनी मंजूरी दिली आहे. तिघांवरही खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण करून मारहाण करणे, जबरी चोरीसह सामाजिक स्वास्थ बिघडविणारे गुन्हे दाखल आहेत.

सोमा सुर्यवंशीसह तिघांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी, सध्याचे पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांनी दिला होता. त्यात सराईत गुन्हेगार सोमा सुर्यवंशी व त्याच्या साथीदारांचे शहर परिसरातील गुन्हे वाढले होते. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करुन त्यांना सराईत गुन्हेगार ठरविण्यात आले होते.

त्या तिघांनीही त्यांच्या टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व अन्य फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे केले. त्यानुसार त्यांच्या त्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला. त्यांच्यावर कायदा कलम ३०७, ३८७, ३२६, ३२४, ५०४, ५०६, ३४, शस्त्र अधिनियमासहीत अन्य गुन्हे दाखल केले आहेत.

त्यात दुर्गादेवीची वर्गणी न देणाऱ्याला बेदम मारहाण त्यांच्या अंगलट आली. त्यात त्यांनी टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले होते. त्याशिवाय त्या तिघांविरोधात यापूर्वी पोलिसात धमकीसह अन्य अवैध मार्गाने दहशत करणे, खुन, खुनाचा प्रयत्न, अपहरण, मारहाण करण्यासह जबरी चोरी, विनयभंग, खंडणी मागणे, अवैध शस्त्र बाळगणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्या सगळ्याचा विचार करून त्यांच्यावर मोक्काची कारवाई झाली आहे. पोलीस अधीक्षक श्री. शेख यांच्या तर्फे दाखल झालेल्या प्रस्तावाला कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी मंजुरी दिली आहे. मोक्काला परवानगी देत श्री. फुलारी यांनी पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकुर यांना तपासाच्या सुचना दिल्या आहेत.

मोक्का प्रस्ताव मंजुरीसाठी पोलिस अधीक्षक श्री. शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर एलसीबीचे पोलिस निरिक्षक अरुण देवकर, तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, तत्कालीन फौजदार राज डांगे, फौजदार पतंग पाटील यांच्यासह हवालदार अमित सपकाळ, आनंदा जाधव, हवालदार सोनाली पिसाळ यांनी विशेष सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com