Karad Airport Modernization Faces Delays; Safety and Development Issues Under Scrutiny
sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड: ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पहिले विमानतळ कऱ्हाडला सुरू झाले. हवाई इमर्जन्सीवेळीही येथील विमानतळाचा वापर केला जातो. विमानतळ प्राधिकरणाच्या नियमानुसार सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना येथील विमानतळावर नाहीत. विमानतळाभोवतीच्या उंच इमारतींचाही अडथळा ठरत असून, त्याचा विमान लँडिंगवेळी धोका होऊ शकतो. विस्तारीकरणाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, त्याला सध्या गती नाही. त्यामुळे विस्तारीकरणाचे काम रखडल्यातच जमा आहे.