
Karad aspirants planning election strategies with ward maps, focus on reservation.
Sakal
-सचिन शिंदे
कऱ्हाड: येथील पालिकेची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यांचे आरक्षण जाहीर झालेले नाही. त्यामुळे आरक्षणाची उत्सुकता लागून आहे. नगराध्यक्षपदाच्या प्रभागनिहाय आरक्षण काय होणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. प्रभागांच्या रचनेचे नकाशे घेऊन काही इच्छुक त्यांच्या गटांची बांधणी करत आहेत. मात्र, आरक्षण जाहीर न झाल्याने त्यांच्या गटबांधणीला गतिरोधक लागत आहे. पालिकेच्या राजकीय घडामोडीही मंदावल्या आहेत.