Karad News : कऱ्हाडची कॅथलॅब साताऱ्याला हलवण्यात येणार; स्थलांतराला कऱ्हाडकरांचा मोठा विरोध

बदलत्या जीवन शैलीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांसह वृध्दापकाळाने ह्दयाचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
Cathlab Karad
Cathlab KaradSakal

कऱ्हाड - बदलत्या जीवन शैलीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांसह वृध्दापकाळाने ह्दयाचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून याची दखल घेऊन आरोग्य विभागाने घेतली आहे. त्याअंतर्गत कऱ्हाड (जि.सातारा) येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कॅथलॅब सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

त्याव्दारे आरोग्य विभागाच्या रुग्णालयात माफक दरात हृदरुग्णांवर अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी करण्यात येणार होती. मात्र ती कॅथलॅब कऱ्हाडला मंजुर होवुन सुरु होण्याअगोदरच ती साताऱ्याच्या जिल्हा शल्य चिकीत्सालयात हलवण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन आदेश काल जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कऱ्हाडकर नागरीक संतप्त झाले असुन त्यांनी आंदोलनाचीही इशारा दिला आहे.

शासनाच्या आदेशात स्थलांतराची स्पष्टता

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये रुग्णाच्या सोयीसाठी जेथे वैद्यकिय महाविद्यालये नाहीत अशा १९ ठिकाणी कॅथलॅब उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. त्यासाठी २३१ कोटी एवढी रक्कम मंजुर करण्यात आली. मंजुर झालेल्या कॅथलॅबमधील उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथील कॅथलॅब जिल्हा रुग्णालय, सातारा येथे जागा उपलब्धतेच्या अधिन राहुन स्थलांतरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे शासनाच्या उद्यादेशात म्हंटले आहे.

पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतरही स्थलांतर

पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते मध्यंतरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील सीटीस्कॅनचा प्रारंभ करण्यात आला. त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री देसाई यांनी कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात कॅथलॅब मंजुर झाली असुन लवकरच ती सुरु करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर केवळ तीनच आठवड्यात शासनाने साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात कॅथलॅब हलवण्याचा आद्यादेश जारी केली आहे. त्यामुळे आश्चर्यच व्यक्त होत आहे.

सहा तालुक्यातील रुग्ण उपचाराला मुकणार

कऱ्हाडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कऱ्हाडसह सातारा, खटाव, वाळवा, शिराळा, कडेगाव, पाटण तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना येथे चांगली आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न रुग्णालयातमार्फत केला जातो. त्यामुळे दररोज शेकडो रुग्ण येथे उपचारासाठी येतात.

येथे कॅथलॅब सुरु झाली असती तर उच्च रक्तदाब, मधुमेह व ह्दयाच्यासंदर्भात आरोग्य सेवा सहा तालुक्यातील रुग्णांना मिळाली असती. मात्र ही कॅथलॅब साताऱ्याला हलवण्यात येणार असल्याने या सहा तालुक्यातील रुग्णांना त्या सेवेपासुन वंचीतच रहावे लागणार आहे.

कऱ्हाड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी सातारा, सांगली जिल्ह्यातील रुग्ण येतात. त्यांच्या सोयीसाठी कॅथलॅब मंजुर करण्यात आली. ती सुरु होण्याअगोदरच साताऱ्याला हलवण्याचा आदेश शासनाने जारी केली आहे. हे नियमाला धरुन नाही. त्याविरोधात आम्ही शासनाकडे पाठपुरावा करुन. वेळ पडली तर आंदोलनही करु.

- सौरभ पाटील, माजी नगरसेवक, कऱ्हाड

कऱ्हाडला कॅथलॅब सुरु करण्यासाठी अद्यादेश आला. त्यानंतर त्यासाठी आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी जागा पाहणीही केली. मात्र आता ते साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याचा अद्यादेश आला आहे. त्याला आमचा विरोध आहे. आरोग्य विभागाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने व कऱ्हाडकरांच्यावतीने मोठे जन आंदोलन उभे करण्यात येईल.

- मनोज माळी, अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष

शासनाने जेथे शासकीय वैद्यकीय महाविदयालय नाही त्या रुग्णालयांसाठी कॅथलॅब मंजुर केल्या. त्यातुन कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयातील कॅथलॅब होणार आहे. मात्र ती साताऱ्याला नेण्यातचा आदेश जारी केला आहे. त्यास आमचा कऱ्हाडकर म्हणुन विरोध आहे. कऱ्हाडला येणाऱ्या रुग्णांसाठी ही कॅथलॅब येथेच राहणे गरजेचे आहे. साताऱ्याला शासकीय वैदयकीय महाविद्यालय आहे. तेथे शासनाने नवीन कॅथलॅब मंजुर करावी. कऱ्हाडची कॅथलॅब हलवल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.

- प्रमोद पाटील, दक्ष नागरीक, कऱ्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com