Karad Hospitals : कऱ्हाड शहरात तब्बल ऐंशी टक्के रुग्णालये फायर ऑडिटविना

कऱ्हाड, पाटणला १५ दिवसांत आगीच्या मोठ्या घटना घडल्या. त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली.
Fire Brigade
Fire Brigadesakal

- सचिन शिंदे

कऱ्हाड - कऱ्हाड, पाटणला १५ दिवसांत आगीच्या मोठ्या घटना घडल्या. त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मोठ्या इमारतींसह रुग्णालयांचा फायर ऑडिटचा सर्व्हे सुरू झाला आहे. त्यात धक्कादायक माहिती समोर येत आहे. मोठ्या रुग्णालयांसह वाणिज्य इमारतींना शासनाने फायर ऑडिट सक्तीचे केले आहे.

शहरात वाणिज्य इमारती नसल्या तरी मोठी रुग्णालये आहेत. अशा सुमारे २०० हून अधिक रुग्णालय इमारतींचा सर्व्हे झाला आहे. त्यात केवळ २० रुग्णालयांच्या इमारतीचे फायर ऑडिट झाले आहे. त्यामुळे केवळ दहाच टक्के इमारती सुरक्षित झोनमध्ये तर ८० टक्के इमारती धोकादायक झोनमध्ये आहेत. त्या रुग्णालयांच्या इमारती फायर ऑडिटविना असल्याने त्यांना फायर ऑडिटची सक्ती गरजेची आहे.

Fire Brigade
Satara : 'बैलगाडा शर्यत' माझ्यासाठी राजकीय विषय नाही, तर माझ्या अस्मितेचा प्रश्न; काय म्हणाले आमदार लांडगे?

फायर ऑडिट सक्तीचा करण्याबाबत पालिकेच्या बैठकीत ठराव झाला आहे. त्याचे व दरवर्षी होणाऱ्या ऑडिटचे दर नंतर ठरविण्याचा निर्णय झाला. त्यासह आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिटची शहरातील इमारतींची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पालिकेच्या अग्निशमन दलातर्फे फायर ऑडिटचा सर्व्हे केला आहे. त्यात इमारतींच्या पाहणीनुसार शहरात २०० हून अधिक रुग्णालयांच्या इमारतींपैकी केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच इमारतींचे फायर ऑडिट झाले आहे.

रुग्णालयांना ऑडिट सक्तीचे असतानाही त्या इमारती ऑडिटविनाच आहेत. फायर ऑडिटविना असलेली रुग्णालये जिवावर बेतणारी आहेत. इमारतीत अचानक उद्भवणाऱ्या संकटाशी सामना करण्यासाठी काहीही सुरक्षितता नाही, असेच दिसते. त्यामुळे त्या इमारतींतील सुरक्षा रामभरोसे आहे. पालिकेसह स्थानिकांचेही होणारे दुर्लक्ष गंभीर आहे.

Fire Brigade
Governor Ramesh Bais : राज्यपालांनी स्वतः पायी चढला प्रतापगड अन् घेतलं शिवरायाचं दर्शन

याची करा तपासणी...

  • रुग्णालयात वाहन जाते का?

  • इमारतीत किती सुरक्षितता आहे?

  • आग विझविण्यासह बाहेर पडण्याचा पर्यायी मार्ग आहे का?

  • इमारतीत साईन बोर्ड आहे का?

  • रुग्णालयातील स्टाफ प्रशिक्षित आहे का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com