
कऱ्हाड: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनात राज्यभरातून सहभागी झालेल्या आंदोलकांना शुक्रवारी जेवण- पाणी न मिळाल्याने मोठे हाल झाले. त्याचा विचार करून कऱ्हाड शहरासह तालुक्यातील मराठा बांधवांनी आवाहन करताच, आज २५ हजारांवर भाकरी-चपात्या, पाण्याच्या बाटल्या, द्रोण-पत्रावळ्या, जेवणासाठी लागणारे साहित्य जमा झाले, तर येथील दत्त चौकातून संबंधित जेवण, रसद आंदोलनकर्त्यांसाठी मुंबईला रवानाही केले.