

olitical Upset in Karad as BJP Loses Mayor’s Chair
esakal
हेमंत पवार
कऱ्हाड : कऱ्हाड (जि.सातारा) येथील नगरपालिकेसाठी चुरशीने झालेल्या मतदानामुळे नगराध्यक्ष कोण होणार याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत यशवंत विकास आघाडी आणि माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीतर्फे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी विजय मिळवुन नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले आहे तर भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर आणि कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण यांनी मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे.