CoronaUpdate : कऱ्हाडातील नगरसेवकाच्या कुटुंबाचा लढा सुरु

CoronaUpdate : कऱ्हाडातील नगरसेवकाच्या कुटुंबाचा लढा सुरु

कऱ्हाड ः शहराने कोरोना बाधितांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. शहरात सध्या ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 50 झाली आहे. रात्री अचानक 12 रुग्ण वाढल्याने खळबळ उडाली. शुक्रवार पेठ, भाजी मंडई, गुरुवार पेठ, रविवार पेठेत रुग्ण सापडल्याने त्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. शुक्रवार पेठेत नगरसेवकाच्या घरातच नऊ बाधित आढळले. भाजी मंडईतील एका रुग्णालयातील कंपाउंडरही बाधित आढळला आहे. त्यामुळेही खळबळ उडाली आहे. रुग्णाची संख्या वाढल्याने शहरात आणखी सहा कंटेनमेंट झोन वाढले आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने न्यायदान शक्य 

येथील बनपुरीकर कॉलनी, रुक्‍मिणी विहार, रविवार पेठ- यादव गल्ली, अंडी चौक, मंगळवार पेठ, शनिवार पेठेतील रणजित टॉवर, पायऱ्या खालील भाग, रुक्‍मिणी प्लाझा भागात सध्या कंटेनमेंट झोन नव्याने झाले आहेत. काल रात्रीपासून शुक्रवार, गुरुवार पेठेसह, मुजावर कॉलनीसह भाजी मंडई परिसरातही 12 रुग्ण सापडल्याने तो भाग कंटेनमेंट झोनमध्ये गेला आहे. शुक्रवार पेठेत नगरसेवकाच्या घरातील नऊ नातेवाइक एकाच वेळी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने त्या परिसरात खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! ऍन्टीजेन टेस्टमध्ये सापडले एवढे छुपे रुग्ण 

नगरसेवक व त्यांचा मुलगा वगळता घरातील सर्वांनाच बाधा झाली आहे. संबंधित नगरसेवकाचा भाऊ व्यवसायासाठी सातारा, वडूज व कऱ्हाड अशा भागांत फिरत होते. त्या वेळी त्यांना संसर्ग झाल्याने घरात कोरोनाची लागण झाली असण्याची शक्‍यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. शुक्रवार पेठेतील तो भाग सील केला आहे. त्या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू आहे. येथील भाजी मंडईतील श्री चेंबर्समधील रुग्णालयातील कंपाउंडर बाधित आढळला आहे. संबंधित कंपाउंडर बाधित रुग्णावर उपचार करत होता. त्यांना इंजेक्‍शनही देत होता. त्याच्या माध्यमातून संबंधित कंपाउंडर बाधित ठरल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री शोधण्याचे काम सुरू आहे. एक गरोदर महिलाही बाधित ठरली आहे. त्यामुळे मुजावर कॉलनीतील काही भाग सील केला आहे. 

तासभर खासदार उदयनराजेंनी जिल्हाधिकारी सिंह यांच्याशी चर्चा केली

क्वारंटाइन होणार 50 नागरिक 

शुक्रवार पेठेतील नऊ, गुरुवार पेठेतील कंपाउंडर, मुजावर कॉलनी येथील महिला, गुरुवार पेठेतील आणखी एक पुरुष असे तब्बल 12 नागरिक एकाच रात्री बाधित ठरले आहेत. त्यांच्या संपर्कातील 50 हून अधिक नागरिकांना क्वारंटाइन केले आहे. त्याशिवाय किमान 25 नागरिकांचे स्वॅबही घेण्यात येणार आहे.

Edited By : Siddharth Latkar
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com