Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश
Karad Depot Gets Five New ST Buses : एसटी महामंडळाने ज्येष्ठ, विद्यार्थी, महिला यांना प्रवास तिकिटात सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीचे महत्त्व आजही कायम आहे. महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिल्याने प्रवाशांची संख्या दुप्पट वाढली आहे.
Public Transport Boost: 5 New Buses for Karad Thanks to Local PushSakal
कऱ्हाड : येथील एसटी आगार मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे प्रवाशांची संख्या जास्त असते. त्याचा विचार करून महामंडळाने आणखी पाच नवीन बस दिल्या आहेत. त्याचे पूजन कर्मचाऱ्यांच्या हस्ते करून आज लोकार्पण करण्यात आले.