

Hundreds of Devotees Join Grand Shivrajyabhishek Day Celebrations in Karad
sakal
कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या ऐतिहासिक क्षणाची स्मृती जागवत जिल्ह्यात आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीनिमित्त तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कऱ्हाडमध्ये श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने आयोजित या सोहळ्यात शेकडो शिवभक्तांनी सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. ‘जय भवानी... जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला.