

The Additional Sessions Court in Karad announced a decisive judgment in the deadly assault case
sakal
कऱ्हाड : किरकोळ वादातून कोणेगाव येथे तरुणावर चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप पतंगे यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. पीडित फिर्यादीला १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचेही यावेळी आदेश दिले.