
-सचिन शिंदे
कऱ्हाड: सार्वजनिक गणेश मंडळांच्या सहा फुटापासून सुमारे तीस फुटाच्या जवळपास २०० हून अधिक गणेश मुर्ती पाण्यात भिजून वाहून जाण्याची शक्यता होती. त्यातून मोठ्या नुकसानीसह संकट कऱ्हाडवर ओढवणार होते. कऱ्हाडातील सर्व जाती धर्माच्या युवकांना कुंभार समाजातील कारगिरांसाठी धो-धो पावसात आठ तास मदत कार्य राबवत १५ फुटापेक्षा मोठ्या सुमारे २०० हून अधिक गणेश मुर्ती सुरक्षीत स्थळी हलविल्या.