

Forest officials in Karad with seized evidence after busting a wild boar smuggling gang during a midnight operation.
Sakal
कऱ्हाड: बीड जिल्ह्यातील रानडुकरांची शिकार करून त्यांची तस्करीने येथे विक्रीस आणणाऱ्या नऊ जणांच्या टोळीला येथील वन विभागाने जेरबंद केले. येथील वनपरिक्षेत्राच्या पथकाने पहाटे पाचच्या सुमारास कासारशिरंबे ते बेलवडे रस्त्यावर ही कारवाई केली. रात्रगस्त घालणाऱ्या पथकाने केलेल्या कारवाईत जिवंत रानडुकरांसह टोळीला वाहनासमवेत अटक केली.