Mumbai-Pune Highway Traffic News
esakal
कराड : गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात आणि वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी अवजड मालवाहतूक वाहनांना १८, १९, २० आणि २५ सप्टेंबर रोजी तसेच २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू करण्यात आली (Mumbai-Pune Highway Traffic News) आहे. वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी याबाबत अधिसूचना जारी केली असून, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे परिक्षेत्राकडून तिची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.