karad ganpati visarjan
sakal
कऱ्हाड - ‘मोरया... मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला यंदा शिस्तीची किनार लाभली. कर्णकर्कश डीजेचा आवाज, डोळ्यांना इजा पोहचवणारी लाईट, मुक्तपणे कऱण्यात येणारी गुलालाची उधळण, बेभान नाचाऐवजी पारंपरिक वाद्यांचा निनाद, भक्तीचा गजर आणि संयमाचे दर्शन घडले. पोलिसांच्या जनजागृतीला तरुणाईने दिलेला हा प्रतिसाद कऱ्हाडच्या उत्सव संस्कृतीला नवी दिशा देणारा ठरला.