Satara Bank Election : कऱ्हाडला 90 टक्के मतदान

Karad Society Group
Karad Society Groupesakal
Summary

सहकारमंत्री पाटील व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

कऱ्हाड : सातारा जिल्हा बॅंकेतील (Satara Bank Election) कऱ्हाड सोसायटी गटातील (Karad Society Group) सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज मतदानादिवशी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व अॅड. उंडाळकर यांच्या समर्थकांनी एकत्र येवून येथील शिवाजी हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मोठ्या राजकीय उलाढालीनंतर आज रविवारी मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी (Nationalist Congress Party) सर्वपक्षीय नेत्यांना विचारात घेवून जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्याला पूर्णपणे यश आले नाही. इच्छुकांची संख्या वाढल्याने जिल्हा बॅंकेच्या २१ जागापैकी ११ जागा बिनविरोध झाल्या, तर उर्वरीत १० जांगासाठी निवडणूक लागली आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील विविध मतदार संघातील २० मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांना निवडूण आणण्यासाठी नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.

Karad Society Group
भाजपच्या आमदाराची निवडणुकीतून माघार

सातारा जिल्हा बॅंकेसाठीच्या कऱ्हाड सोसायटी गटात १४० मते आहेत. त्या गटातून खुद्द राज्याचे सहकार खाते ताब्यात असलेले सहकार मंत्री पाटील यांनी सोसायटी गटातून कौल आजमावला आहे. त्यांच्या विरोधात माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी उमेदवारी घेतली आहे. ही लढाई मोठी प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान, आज सहकारमंत्री पाटील, अॅड. उंडाळकर यांच्या समर्थकांनी येथील शिवाजी हायस्कूलमध्ये येवून निवडणुकीसाठीच्या मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, सकाळी साडेदहा वाजताच 90 टक्के मतदान पूर्ण झाले.

Karad Society Group
Big Fight : सेनेच्या गृहराज्यमंत्र्यांसमोर राष्ट्रवादीचे कडवे आव्हान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com