भाजपच्या आमदारावर राष्ट्रवादी, शिवसेनेची भिस्त; कोणाच्या पारड्यात 'मतदान' I Bank Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Bank Election

आमदार गोरे काय करणार, यावर 'विजयश्री' कोणाच्या गळ्यात माळ घालणार हे ठरणार आहे.

भाजपच्या आमदारावर राष्ट्रवादी, शिवसेनेची भिस्त; कोणाच्या पारड्यात 'मतदान'

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांनी माघार घेतल्यानंतर ट्विस्ट निर्माण झालेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara Bank Election) माण सोसायटी मतदारसंघासाठी (Maan Society Constituency) येथील महात्मा गांधी विद्यालयात (Mahatma Gandhi School) शांततेत मतदान सुरु आहे. ७४ मतदार संख्या असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचे मनोज पोळ (NCP leader Manoj Pol) व शिवसेनेचे शेखर गोरे (ShivSena leader Shekhar Gore) यांच्यात सरळ लढत होत आहे.

मनोज पोळ व शेखर गोरे या दोघांकडेही विजयी होईल इतके संख्याबळ नाही. त्यामुळे आमदार जयकुमार गोरे व बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलेले अनिल देसाई यांच्यावर या दोघांचीही भिस्त आहे. विशेषत: आमदार गोरे काय करणार यावर विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार हे ठरणार आहे. आज सकाळच्या सत्रात साधारण पंचवीस मतदारांनी मतदान केले. त्यात बहुतांशी राष्ट्रवादी समर्थक होते. त्यामुळे शेखर गोरे त्यांच्या मतदारांचे मतदान एकगठ्ठा करणार का? आमदार गोरे यांचे समर्थक कसे व केव्हा? मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: 'फडणवीस, चंद्रकांतदादांशी बोलूनच NCP मंत्र्यांना केलं मतदान'

मतदान झाल्यानंतर मतदार तसेच नेतेमंडळी, समर्थक हे येथील फलटण चौकात असलेल्या हाॅटेल कृष्णा येथे एकत्रित येवून हास्यविनोदात दंग झाले होते. त्यामुळे तणाव जावून वातावरण हलकेफुलके राहण्यास मदत होत होती. दरम्यान, मतदान केंद्रावर शेखर गोरे व सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्यात नियमांच्या कारणावरून किरकोळ शाब्दिक चकमक झाली. पण, काहीवेळातच यावर पडदा पडला.

हेही वाचा: Big Fight : सेनेच्या गृहराज्यमंत्र्यांसमोर राष्ट्रवादीचे कडवे आव्हान

loading image
go to top