

Patients share concerns as Health Minister conducts sudden inspection in Karad
Sakal
कऱ्हाड : येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी आज रात्री अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील स्वच्छतेबाबत काही सूचना केल्या. रुग्णांशी संपर्क साधून आरोग्य सेवेबाबत विचारणा केली. त्यावर रुग्णांनी चांगली सेवा मिळत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्याने आरोग्यमंत्री आबीटकर यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयातील सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.