Satara News : कऱ्हाडला इंडिया आघाडीच्या सभेपूर्वीच बैठकांची खलबते; जयंत पाटलांनी घेतली चव्हाण यांची भेट

लोकसभा निवडणुकांच्या पार्शवभुमीवर सातारा आणि सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत कऱ्हाडमध्ये खलबत्ते सुरू आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आज माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
Karad India Alliance meeting Jayant Patil meets prithviraj Chavan lok sabha election
Karad India Alliance meeting Jayant Patil meets prithviraj Chavan lok sabha electionSakal

कऱ्हाड : लोकसभा निवडणुकांच्या पार्शवभुमीवर सातारा आणि सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत कऱ्हाडमध्ये खलबत्ते सुरू आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आज माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यात तब्बल एक तास कमराबंद चर्चा झाली.

त्याचा तपशील सांगण्यास नकार देत आमदार पाटील यंनी त्याबाबत नंतर बोलतो, असे म्हणत तेथून निघून गेले. मागील आटवड्यात कॉग्रेसचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भेट देवून आमदार चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे आजच्या भेटीने पुन्हा एखदा सातारा व सांगली जिल्ह्यातील उमेदवारीबाबतचा खल अद्यापही सुरू असल्याचे समोर आले. महाविकास आघाडीत सांगली जागेवरून मतभेद आहेत.

तर आघाडीचे सातार्यातील उमेदवार निस्चीत होताना दिसत नाही. त्या सगळ्याच्या पार्शवभुमीवर आमदार चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट अत्यंत महत्वाची ठरली आङे. त्या दोघांमध्ये कमरा बंद चर्चा झाली. जळपास तासभर त्यांनी चर्चा केली. त्यातील तपशील समजू शकला नाही.

मात्र सातारा लोकसभा मतदार संघाबाबत त्यांनी आवर्जून आमदार चव्हाण यांची भेट घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीय़ांनी स्पष्ट केले. साताऱ्याबरोबच सांगली जागेवरूनही चर्चा झाली. इंडिया आघाडीच्या बैठीकापूर्वीच दोन्ही दिग्गज नेत्याच झालेल्या चर्चा सध्या जोरदार चर्चेत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com