Satara News : कऱ्हाडचा कार्वे नाका बनतोय हॉटस्पॉट

भरदिवसा खुनामुळे चर्चेत; पोलिस कारवाईला मर्यादा, हवा स्वतंत्र आराखडा
karad karve naka crime spot police action satara crime news
karad karve naka crime spot police action satara crime newsesakal

कऱ्हाड : सल्या चेप्यासारख्या गुंडाची दहशत, त्याच्या प्रतिस्पर्ध्याशी झालेल्या चकमकींमुळे दहा वर्षांपूर्वी कार्वे नाका परिसर चर्चेत असायचा. त्याचे व त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचेही वास्तव्य त्या भागात होते, त्यामुळे सतत खटके उडायचे.

त्यासह गाजलेले महिला अत्याचार प्रकरणही कार्वे नाका येथे उघडकीस आले होते. दहा वर्षांनंतरची स्थिती थोडी आटोक्यात आली आहे, असे वाटत असतानाच भरदिवसा झालेल्या खुनाने कार्वे नाका परिसर पुन्हा एकदा हॉटस्पॉट बनल्याचे स्पष्ट झाले आहे. क्षुल्लक कारणाने भर दिवसा खून झाल्याने तो परिसर हादरला आहे.

अलीकडच्या काळात त्याच परिसरात मारामाऱ्या, चोऱ्यासांरख्या प्रकारामुळे त्या परिसरातील नागरिक हैराण आहेत. त्या परिसरात सुविधांची वानवा असताना त्याच भागात गुन्हेगारीने त्रासलेल्या नागरिकांना पोलिस दिलासा देणार का? हा प्रश्न आहे.

कॉलन्यांभोवती दहशत

कार्वे नाका हे शहराचे उपनगर आहे. त्या परिसरात ८० हून अधिक कॉलन्या आहेत. कार्वे नाक्याच्या चौकातून चार बाजूला रस्ता जातो. त्या प्रत्येक रस्त्याला लागून कॉलन्यांसह नागरी वस्तीचा भाग आहे. त्या भागात अद्यापही पालिकेने सुविधा दिलेल्या नाहीत.

सुविधांसाठी तेथे नेहमीच झगडावे लागत आहे. शहर व गोळेश्वर, कापीलच्या हद्दीवरील कॉलन्यांत असुविधा आहेत. त्या परिसरातील नागरिक सातत्याने आंदोलनाचे इशारे देतात. असुविधांमुळे त्रासलेल्या नागरिकांना आता गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांनी असुरक्षित वाटू लागले आहे.

karad karve naka crime spot police action satara crime news
Satara News : खासगी एजंटांकडून एसटी प्रवाशांची पळवापळवी

मारामाऱ्यांसह धूम स्टाइलचाही त्रास

सततच्या मारामाऱ्या, वेगाने जाणाऱ्या दुचाक्या, वाजणारे कर्णकर्कश हॉर्न, टपोरींची दादागिरी, महिलांची छेडछाडसारख्या प्रश्नाला तोंड देताना नागरिक हैराण आहेत. अलीकडच्या तीन वर्षांत पुन्हा त्या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. कार्वे नाका परिसरात चोऱ्या तर सर्रास होतात. तेथे चोरी केली पळून जाण्यासाठी कऱ्हाड ते तासगाव रस्ता व थेट पुणे- बंगळूर महामार्गही तेथून जवळ आहे.

अशी आहे स्थिती

  • वर्षभरात कार्वे नाका व परिसरात किमान २५ मारामाऱ्यांची नोंद

  • कार्वे नाका परिसरात वर्षभरात १०० हून अधिक चोऱ्या

  • मोठ्या गुन्ह्यांतील संशयितांचा सर्वाधिक वावर

  • शहरातील तीन गुंडांच्या टोळ्यांच्या चकमकीचा प्रकार

  • गुंड सल्या चेप्यावरही मार्केट यार्ड परिसरात झाला होता गोळीबार

karad karve naka crime spot police action satara crime news
Satara : सातारा वाहतूक पोलिसांचा फंडा : महाविद्यालय परिसरात वाहतुकीला शिस्त

याकडे होतेय दुर्लक्ष

  • गुंडांच्या टोळ्यांवर वचक नाही

  • दिवसा ढवळ्या होणाऱ्या गुन्हेगारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

  • धूम स्टाइलने होणाऱ्या चोऱ्यांच्या तपासातही प्रगती नाही

  • धूम स्टाइलने वाहन चालविणाऱ्यांवर हवी कारवाई

  • चोऱ्या नियंत्रणात आणण्यात पोलिसांचे अपयश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com