

Karad Crime
Sakal
कऱ्हाड: मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याच्या रागातून १५ वर्षीय मुलावर चाकूने वार करण्यात आले. शहरातील मुजावर कॉलनीतील चौकात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. फैजान फैयाज बारगीर (वय १५, रा. दौलत कॉलनी, शनिवार पेठ, कऱ्हाड) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शहाबाद ऊर्फ छोटा इस्माईल पठाण (वय ३०, रा. मुजावर कॉलनी) याच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.