'बैलगाडीचा कासरा हातात धरला, आता राज्याचा कासराही हातात धरा'; फडणवीसांबाबत उदयनराजेंचं सूचक विधान

कराडात कृषी प्रदर्शनाचे नुकतेच उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडले.
Bullock Cart Devendra Fadnavis Udayanraje Bhosale
Bullock Cart Devendra Fadnavis Udayanraje Bhosaleesakal
Summary

अतुल भोसले यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या दुरुस्तीसाठी केलेली मागणी पूर्ण करा, तसेच रणजीचे सामने कराडात भरावा.

कराड : कराडात कृषी प्रदर्शनाचे नुकतेच उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडले. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले हे दोघेही बैलगाडीतून प्रदर्शन स्थळी आले. यावेळी उदयनराजे म्हणाले, बैलगाडीचा (BullockCart) कासरा हातात धरला, आता राज्याचा कासरा हातात धरावा अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे, असं उदयनराजेंनी फडणवीसांना उद्देशून म्हटलं.

उदयनराजे (Udayanraje Bhosale) पुढे म्हणाले, अतुल भोसले यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या दुरुस्तीसाठी केलेली मागणी पूर्ण करा, तसेच रणजीचे सामने कराडात भरावा. तुमच्या उपस्थितीतच रणजी सामने होऊ द्या आणि टीममध्ये मलाही घ्या. मला रिझर्वमध्ये ठेऊ नका, नाही तर स्टेजवर असेलेले हुशार आहेत, ते मला रिझर्वमध्ये ठेवतील, अशी मिश्किल टिप्पणीही उदयनराजेंनी केली.

Bullock Cart Devendra Fadnavis Udayanraje Bhosale
Sharad Pawar : रामभक्तांना डावलून अयोध्येत फक्त भाजप भक्तांनाच महत्त्‍व दिलं जातंय; शरद पवारांचा रोख कोणावर?

कृष्णाकाठाचे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून आणि कृष्णा विश्व विद्यापीठ, कृष्णा सहकारी बँकेच्या सहकार्यातून कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आजपासून २१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले, सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com