Malkapur Karad sugarcane trolley accident today
esakal
मलकापूर : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसमोर अचानक दुचाकी आल्याने चालकाने ट्रॅक्टरला जोरात ब्रेक लावला. त्यामुळे मागील उसाने भरलेली ट्रॉली विरुद्ध दिशेला जाऊन दुसऱ्या दुचाकीवर पलटी (Karad Road Accident) झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरील आईचा मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) सकाळी दहाच्या सुमारास मलकापूरमधील आगाशिवनगर येथील कोणार्क पार्कसमोर घडली. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास विस्कळित झाली होती.